१९-७-१९४२ लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे क्कीच लाभतील, नपण लोकशाही मेली तर विनाश अटळ - Page 449

लोकशाही जिवंत .. .... तर विनाश अटळ ४११

प्रथम या जातीय निवाड्याला मि. गांधीनी मान्यता दिली नाही. इंग्रज सरकारने दिलेला आपला निर्णय बदलावा म्हणून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. परंतु अस्पृश्य लोक हिंदूंपासून स्वतंत्र घटक नाहीत व त्यांना स्वतंत्रपणे राजकीय अधिकार नाहीत हे सिद्ध करण्याची त्यांची धडपड गोलमेज परिषदेप्रमाणेच या उपवासातही अयशस्वी ठरली. गोलमेज परिषदेत मांडलेले माझे मुख्य तत्त्व त्यांना त्यांच्याच उपवासामुळे घडून [आलेल्या ] [पुणे ] [करारामध्ये ]

मान्य करावेच लागले. |

पहिल्या फेरीत अस्पृश्यांनाच जय मिळाला. महायुद्ध सुरू झाल्यानंतर आणि भारतीय राजकारणात काँग्रेसला महत्त्वपूर्ण स्थिती प्राप्त झाल्यानंतरसुद्धा आमची स्थिती शाबूत होती. खरेच, अजूनही आमच्या हक्कांबद्दल शाश्‍वतीच होती व ८ ऑगस्ट १९४० रोजीच्या व्हाइसरॉयच्या निवेदनामुळे ती टिकून राहिली होती. अस्पृश्य आणि मुसलमान हे भारतीय राष्ट्रजीवनांतील ठळक व स्वतंत्र घटक असल्यामुळे, ज्या राज्यघटनेला मुसलमान आणि दलितवर्गाचा पाठिंबा राहाणार नाही ती राज्यघटना ब्रिटिश सरकार लागू करणार नाही, असे त्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.

आपली स्थिती कितपत मजबूत आहे याविषयी मी आतापर्यंत बोललो. आपली ही स्थिती कमजोर करण्याकडे कोणकोणत्या शक्तींचा कल आहे हेही आता मी सांगितले पाहिजे. आपली स्थिती कमजोर करणाऱ्या गोष्टीपैकी एक अत्यंत घातक गोष्ट म्हणजे गांधी आणि गांधीवाद. पुणे करारावर सही करून मी श्री. गांधींचा जीव वाचविला आहे. परंतु आपल्या वचनाला जागण्याच्या हेतूने सभ्य माणसाप्रमाणे श्री. गांधींनी सही करून त्याचा स्वीकार केलेला नाही, तर एका कावेबाज माणसाने केवळ एका कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केलेला तो एक करार आहे. कारण मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की पुणे कराराने श्री. गांधींना जीवनदान दिले असताही त्यात असलेल्या तत्त्वांना त्यांनी कधीच प्रामाणिकपणे व खराखुरा रुकार दिलेला नाही. विभक्तपणे अस्पृश्यांना राजकीय अधिकार मिळू न देण्याचा त्यांचा दृढनिश्चय कायम टिकून आहे आणि आमच्या अधिकारांच्या विरोधी व आमची स्थिती कमजोर करण्यासाठी जे जे करणे शक्य असेल ते ते करण्याची त्यांची नेहमीच तयारी

असते. श्री. गांधी हे आपले सर्वात मोठे प्रतिपक्षी आहेत हे तुम्ही नीट मनात बाळगावे, असे मला वाटते. शत्रु हा शब्द वापरण्यास पुरेसे समर्थन करता येण्यासारखे असले तरीही मला ते आवडत नसल्यामुळे ' शत्रु ' हा शब्द मी वापरला नाही. त्यांच्या कृत्रिम वाकचातुर्याला आपणापैको बरेच जण