४१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
फसतात. परंतु मी तुम्हाला बजावून सांगतो की तुमची बाजू कमजोर करणाऱ्या
ज्या ज्या विरोधी बाजू आहेत व राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या ज्या
गोष्टींविरुद्ध तुमचे सैन्यबल तुम्हाला केन्द्रित करावयाचे आहे, त्यांच्यापैकी सर्वात
प्राणघातक अशी जर कोणती शक्ती असेल तर ती श्री. गांधी होय. हे लक्षात
घेण्यास तुम्ही विसरलात तर तुम्ही भयंकर चूक केली असे होईल. तुमची स्थिती
कमजोर करणाऱ्या गोष्टीत दुसरा क्रमांक ब्रिटिश सरकारच्या झालेल्या
वुत्तीबदलाला दिला पाहिजे. ८ ऑगस्ट १९४० च्या जाहीर निवेदनापर्यंत ब्रिटिश
सरकारचा दृष्टिकोन अस्पृश्यवर्ग हा स्वतंत्र व ठळक घटक आहे व तो इतका
ठळक व महत्त्वाचा घटक आहे की घटनेमधील कोणताही बदल ह्यांच्या
संमतीशिवाय होऊ शकत नाही, असा होता. परंतु सर स्ट्राफर्ड क्रिप्स
यांच्याबरोबर ज्या योजना त्यांनी पाठविल्या त्या पाहिल्या असता ब्रिटिश सरकारने
पूर्णत: पाठ फिरविली असे दिसते, कारण सर स्ट्राफर्ड क्रिप्स यानी काहीही भीड- मुर्वत न ठेवता जाहीर करून टाकले की क्रिप्स योजनेत अंतर्भूत असलेला कोणताही घटनाविषयक बदल घडवून आणण्यास केवळ मुसलमान आणि हिंदुंची संमती पुरेशी आहे, अस्पृश्यांच्या संमतीची आवश्यकता नाही. स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे भारताच्या राष्ट्रजीवनात अस्पृश्यांना स्वतंत्र महत्त्वाचा घटक म्हणून देण्यात आलेली मान्यता आता काढून टाकलेली आहे. सहा ते सात कोटी अस्पृश्यांचे केवळ काही महिन्यांच्या अवधीतच राष्ट्राचे मुख्य घटकत्व नाहीसे कसे होते ही गोष्ट कोणाच्याही आकलनाच्या पलिकडे आहे. ब्रिटिश सरकारने मारलेली ही कोलांटउडी आहे, अस्पृश्यांचा भयानक विश्वासघात आहे. या विश्वासघाताची कारणे कोणतीही असोत व ब्रिटिश सरकारच्या या अन्यायाबद्दल तुमच्या मनात कितीही तीव्र भावना निर्माण झालेल्या असोत, परंतु आपल्या पक्षाला पडलेला हा मोठा तडा आहे, ही गोष्ट ओळखली पाहिजे. विरोधी प्रकारची आणखी तिसरीही एक परिस्थिती आहे, की तिच्याकडेही आपले लक्ष वेधून घेण्यास मी विसरू नये. एक अशी वेळ होती की भारतातील विविध अल्पसंख्यांक जातींमध्ये जातीकल्याणावर आधारित एकात्मतेची भावना होती व त्यांच्यापैकी मुसलमान हा प्रमुख वर्ग होता. ही एकात्मता आता निघून गेलेली आहे. मुस्लिम लीगने मुसलमान लोकांच्या दृष्टिकोनात घडवून आणलेल्या बदलामुळे मुख्यत: हे घडून आलेले आहे. १९३७ च्या निवडणुकीनंतर जीनाद्वारे सजीव झालेल्या मुस्लिम लीगने मुसलमान वर्ग हा एक अल्पसंख्यांक वर्ग आहे हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून कार्यवाहीला सुरुवात केली व अल्पसंख्यांक असल्यामुळे इतर अल्पसंख्यांकांची मदत घेऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. परस्परांनी केलेल्या सहकार्यातून निर्माण होणाऱ्या