१६-१-१९३७ या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत - Page 45

या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत ७

मला असे कळले आहे की काही विरोधीप्रचारक आपल्याकडे मते मागण्यासाठी आले असता दोन मते श्री. गायकवाडास द्या व दोन मते श्री. रोकड्यास द्या, अशी मतदारांची विनंती करीत फिरत आहेत. कारण, दोन्ही उमेदवार जातीचीच लेकरे आहेत असेही ते प्रचारक सांगत फिरत असल्याचे समजते. याबाबत मला तुम्हाला स्पष्ट सांगावयाचे आहे की, या जिल्ह्यातर्फ आपल्याला एकच इसम निवडून द्यावयाचा असल्याने मतांची अशी विभागणी करून भागणार नाही आणि जर तुम्ही तुम्हास दिलेल्या एका जागेसाठी मिळालेली मते निरर्थक वाटू लागतात तर त्यात तुमचा आत्मघात आहे-मोठे असे नुकसान आहे, हे विसरून चालणार नाही. तसेच तुमच्या या मतांकरिता लोक तुम्हास पैशांची लालूच दाखवितील, कामापुरता मामा या न्यायाने गोड थापा मारतील. परंतु, तुम्ही कोणत्याही मोहास बळी पडू नका. मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे. मुक्तीचे मिळालेले साधन जर तुम्ही पैशावारी विकाल तर मग तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही व मूर्ख तुम्हीच. यासाठी बंधूंनो आणि भगिनींनो कोणत्याही स्थितीत तुम्हास मिळालेला हा अधिकार पैशावारी विकू नका, अशी नम्न सूचना आहे.

मी, काल येथे आल्यानंतर श्री. रोकडे हे फार श्रीमंत आहेत म्हणून त्यांना मते द्यावीत, म्हणून काही लोक म्हणत असल्याचे मी ऐकले. याबाबत मी तुम्हास स्पष्टपणे सांगतो की, बाबांनो, कायदेमंडळे ही काही श्रीमंतांची

प्रदर्शने मांडण्याची ठिकाणे नाहीत. तेथे गरीब अगर श्रीमंत हा भेद नसून

'ज्याची तरवार खंबीर तो हंबीर' या न्यायाने कायदेमंडळात आपल्या पक्षाच्यावतीने

भांडणारा रस्त्यावरचा भिकारी हा श्रीमंतीत आणि ऐषआरामात लोळणाऱ्या

नादान, ऐदी व मुक्या श्रीमंतापेक्षा अनेक पटीने श्रेष्ठ आहे. कायदेमंडळात

निवडावयाच्या उमेदवाराची लायकी ही श्रीमंतीवर अधिष्ठित झाली नसून ती

कर्तबगारीवर, समाजसेवेवर व खडतर तपस्येवर अधिष्ठित झाली आहे.

नुसत्या श्रीमंतीवर भुलण्याचे काही कारण नाही. कारण श्रीमंत संभाजी

रोकडे यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा त्यांच्या मुलाकडे गेलेला

आहे. श्रीमंत धोंडिबा रणखांब्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा

त्यांच्या मुलाकडेच गेला आहे. माझ्या निधनानंतर माझ्या संपत्तीचा वारसा

माझ्या मुलांकडे जाईल. जर असे तर मग श्रीमंतांचे लुम्हा-आम्हाला काय ?

कित्येक लोक असे म्हणतात की कायदेमंडळात अत्यंत हुशार आणि कर्तबगार