लोकशाही जिवंत ...... तर विनाश अटळ ४१३
शक्तीवर मुस्लिम लीगचा इतका दृढ विश्वास होता की, इतर अल्पसंख्यांकांच्या | हिताचे कार्यही मुस्लिम लीगने स्वीकारले व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविणारे ठराव केले. अशातऱ्हेने केवळ मुसलमानांचीच ती बाजू येत नव्हती तर भारतातील सर्व अल्पसंख्यांकांची रक्षणकर्ती म्हणून मुस्लिम लीगने कार्य केले. लीगची ही वृत्ती निस्संदेहपणे अस्पृश्यांना फार उपकारक होती. अस्पृश्यांचीही वृत्ती अर्थात तशीच होती. परंतु लीगच्या वृत्तीमध्ये आता पूर्णतः बदल झालेला आहे. जेव्हापासून मुस्लिम लीगने पाकिस्तान संबंधीचा निर्णय जाहीर केला तेव्हापासून आता मुसलमान वर्ग हा भारतीय राष्ट्राचा एक
घटक आहे असे लीग मानत नाही. ते एक स्वतंत्र राष्ट्र आहे. असे त्यांचे
प्रतिपादन आहे. येथेच सर्व काही संपले असे नव्हे तर मुस्लिम लीग यापुढे
जाऊन असे समजते की, भारतातील इतर जातींशी त्यांना काही एक कर्तव्य
नाही. हिंदुंशीही काही कर्तव्य नाही व इतर अल्पसंख्यांक जातींशीसुद्धा काही
संबंध नाही. मुस्लिम लीगच्या एकीचा अर्थ साधा आहे. ही एको कोणत्याही
तऱ्हेचा भेदभाव किंवा विचार न करता सर्व अ-मुसलमान लोकांविरूद्ध केलेली एकी
आहे. मुस्लिम लीगच्या वृत्तीमध्ये झालेल्या या बदलाचा अस्पृश्यांच्या राजकारणावर
गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहू शकत नाही. याचा अर्थ असा की, अस्पृश्यांनी
आपला एक सहकारी गमावलेला आहे. मुसलमान विरूद्ध अ-मुसलमान अशा
तऱ्हेची नवीन विचारसरणीच केवळ मुस्लिम लीगने तयार केली असे नव्हे, तिने
एक नवीन समीकरण निर्माण केले आहे, ते एक साधे समीकरण आहे. मुसलमानांची
संख्या कितीही असो. ती अ-मुसलमानांच्या बरोबरीची आहे व म्हणून कोणत्याही
राजकीय तडजोडीमध्ये मुसलमानांना अर्धा वाटा मिळालाच पाहिजे. या
समीकरणाला कोणीही संमती देऊ शकत नाही. हे केवळ गणितविरोधीच नव्हे
तर अस्पृश्यांसहित सर्व अ-मुसलमानांच्या कल्याणाच्या हे विरोधी आहे. मुस्लिम
लीगच्या राजकीय धोरणात झालेला हा बदल लक्षात घेतला तर अस्पृश्यांनी
आपला केवळ एक सहकारी गमावला एवढेच नाही तर त्यांचा एक मित्र नाहिसा
झाला आहे. कारण ज्याअर्थी लीग प्रत्येक क्षेत्रात पन्नास प्रतिशत प्रतिनिधीत्व
मागत आहे त्याअर्थी अस्पृश्य आणि मुसलमान यांच्यात विरोध निर्माण
होईल, यात मुळीच संदेह नाही. भारतीय राजकारणात आपली स्थिती काय
आहे, याबद्दल मी आपणाला कल्पना दिलेली आहे. त्याचप्रमाणे या स्थितीला
सुरूंग लावण्यासाठी कोणकोणत्या शक्ती कार्य करीत आहेत याचीही आपणास
कल्पना दिली. आता माझ्या मताप्रमाणे तुम्ही कोणत्या राजकीय मागण्या