४१४ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मागाव्या या संबंधी कल्पना देऊ इच्छितो. या मागण्या तुम्ही अत्यंत स्वच्छ!
शब्दात तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमची स्थिती स्पष्ट
होईल. आपला कोणकोणत्या गोष्टींना पाठिंबा आहे, हे आपल्या लोकांना
कळेल. आपल्या विरोधकांनाही आपल्या मागण्यासंबंधीची नोटीस मिळेल.
सर्वप्रथम, भारतीय = ~ Te e राष्ट्रजीवनात स्वतंत्र व विभक्त घटक म्हणून आपणास
ओळखण्यात यावे, असा आग्रह तुम्ही धरला पाहिजे. अस्पृश्य हे हिंदुंचा केवळ
एक उप-विभाग आहेत, या विचारसरणीला तुम्ही नखशिखांत विरोध केला
पाहिजे. हिंदुंपासून स्वतंत्र घटक म्हणून अस्पृश्यांना मान्यता मिळविण्यात जर
अपयश आले तर ते हिंदुतच राहतील व त्यामुळे त्यांच्यावर गुलामगिरी लादल्या |
जाईल व हळूहळू त्यांची अधोगती होईल. पुढची गोष्ट म्हणजे अस्पृश्यांच्या
शिक्षणासाठी आपापल्या वार्षिक बजेटमधून राज्य सरकारांनी व मध्यवर्ती |
सरकारने एक रक्कम बाजूला काढून ठेवावी अशी घटनेमध्येच तरतूद करण्याची
तुम्ही मागणी केली पाहिजे. अशातन्हेची मागणी तुम्ही. फक्त प्राथमिक |
शिक्षणाकरताच नव्हे तर उच्च शिक्षणाकरिताही केली पाहिजे. नेतृत्वाच्या ` दृष्टिकोनातून आणि वरच्या दर्जाच्या सरकारी नोकरीच्या जागा भरण्याच्या
दृष्टीने अस्पृश्यांना उच्च शिक्षणाची अतिशय आवश्यकता आहे. तिसरे म्हणजे
सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्यांसाठी काही ठराविक जागा राखून ठेवण्यात
याव्यात व या जागा आवश्यक त्या कमीतकमी पात्रतेच्या नियमाप्रमाणे भराव्या
हे अत्यावश्यक आहे. कारण आम्ही, वाईट कायदे असल्यामुळे, यातना भोगतो
आहोत असे नव्हे तर वाईट शासनामुळे आम्हाला यातना भोगाव्या लागत
आहेत. हे शासन केवळ हिंदू जातींच्या हाती असल्यामुळे वाईट झाले आहे. हे
हिंदू, सामाजिक पूर्वग्रह शासनातही घेऊन जातात व तत्त्वत: अस्पृश्यांना
मिळावयास हवा असणारा लाभ कोणते तरी कारण दाखवून ते त्यांना सतत मिळू
देत नाहीत. जेथपर्यत तुमचे शासन चांगले नाही तेथपर्यंत चांगले कायदे तुमचे
काहीच कल्याण करू शकत नाही आणि अस्पृश्यांपैकी काही लोक सरकारी
नोकऱ्यांच्या पदावर जेव्हा जातील तेव्हाच तुम्हाला चांगले शासन मिळेल. कारण हे लोक, हिंदू अधिकारी अस्पृश्यांशी कशा तऱ्हेचे आचरण करीत आहेत यावर नजर ठेवून त्याला आळा घालतील व काही टवाळकी करण्यापासून त्यांना रोखतील. तथापि, केवळ राखीव जागांसाठी मागणी करणे पुरेसे नाही तर ह्या राखीव जागा ठराविक काळाच्या आत भरल्या जाव्या असा आग्रह धरणेही अत्यंत आवश्यक आहे. केवळ राखीव जागांपेक्षा याचे महत्त्व अतिशय आहे. कारण तुम्ही काळ निश्चित केल्याशिवाय राखीव जागा अस्तित्वात येणारच नाहीत. काही तरी कारणे दाखवून टाळाटाळ केल्या जाईल व अर्थातच