लोकशाही जिवंत-. . . . . . तर विनाश अटळ ४१७
अस्तित्वात असलेल्या सर्व संस्था रद्द केल्या पाहिजेत. तुम्हाला आवश्यक असलेली शक्ती यामुळे तुम्हास मिळेल व एकत्रित आघाडी उभारण्यासाठी मदत
होईल. . अशारितीने कार्य करण्यास तुम्ही समर्थ व्हाल. योग्य त्या कळकळीने हा प्रश्न तुम्ही हाताळाल अशी मला आशा आहे.
अस्पृश्यांच्या समस्येसंबंधी माझे विचार व भावना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मला आशा आहे की, तुम्ही यावर नीट विचार कराल. |
भाषण संपविताना युद्धासंबंधी आपली वृत्ती कोणती यावर बोलणे बरे होईल. सुरुवातीपासून सरकारच्या युद्धप्रयत्नांना आपला पाठिंबा आहे. मला खात्री आहे की, आपला पुढेही त्याला पाठिंबाच राहील. आमच्या काही राजकीय
| मागण्या आहेत. त्याच्यासंबंधी आम्ही आग्रह धरतो. त्या पूर्णही होतीलच.
परंतु आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशातऱहेची कोणतीही अट न घालता आम्ही सरकारच्या युद्ध प्रयत्नांना पाठिंबा दिलेला आहे. पण याचा अर्थ युद्धाच्या यशस्वी अंतापेक्षा आम्ही आमच्या मागण्यांना कमी महत्त्व देतो असा नव्हे. आम्ही युद्धाला पाठिंबा देताना कोणत्याही प्रकारची अट घातली नाही याचे कारण त्या युद्धाचा शेवट अयशस्वी झाल्यास जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यापेक्षा युद्धाचा शेवट यशस्वी झाल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती आमचे राजकीय ' प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपकारक होईल असे आम्हाला वाटते. हे लोकशाही आणि हुकूमशाही यामधील युद्ध आहे. ती सुद्धा उदारमतवादी कल्याणकारक हुकूमशाही नव्हे तर ती अत्यंत रानटी स्वरुपाची हुकूमशाही होय. तिचा पाया नीती नसून वांशिक उद्धटपणा आहे. पूर्णतः नायनाट करून टाकण्याजोगी जर कोणती हुकूमशाही असेल तर ती हीच नीच नाझी हुकूमशाही होय. नाझीझमचा विजय झाल्याने जी भयंकर विपत्ती ओढवणार आहे तेवढी भयंकर गोष्ट अजून घडली नाही व भविष्यातही कदाचित दुसरी घडणार नाही, हे आपण विसरून जाण्याची शक्यता आहे. तिचा वंशावर आधारलेला पाया हा भारतीय लोकांना अधिक धोकादायक ठरणार आहे ही फार महत्त्वाची बाब आहे. परिस्थिती संबंधीचे हे विचार जर बरोबर असतील तर या जगाच्या पाठीवरून माणसामाणसातील संबंधाचे योग्य पालन करविणारे लोकशाहीचे तत्त्व लुप्त होऊ नये म्हणून लक्ष देणे आपले जबरदस्त कर्तव्य ठरते असे मला वाटते. आपला जर त्यावर विश्वास असेल तर आपण त्याशी एकनिष्ठेने व सत्याने वागले पाहिजे. आपला लोकशाहीवर खंबीर विश्वास असूनच भागणार नाही, तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तत्त्वांचा मुळासह नाश करणाऱ्या | लोकशाहीच्या शत्रुला कोणत्याही कृत्याने आपण मदत करणार नाही, असा