२०-७-१९४२ शिक्षित व्हा. चळवळ करा, संघटित व्हा आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका ही आमच्या जीवनाची पंचसूत्री - Page 461

१९६

ब्राद्दाणशाहीला प्राणघातक ठोसा

दिनांक १८ आणि १९ जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित अखिल भारतीय दलित वर्ग परिषदेत समारोपाचे भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर

म्हणाले,

मित्रांनो,

` मागच्या दहा वर्षात राजकीय चळवळींना मोठी गती आलेली आहे. तथापि, अस्पृश्यांचा जेथपर्यंत संबंध आहे तेथपर्यंत पाहाता तुम्ही आज जे ठराव पास केलेले आहेत त्यांनी अस्पृश्यांच्या नव्या युगाला सुरुवात झाली आहे, अशी मला खात्री आहे. तुम्हाला माहितच आहे की, उद्यापासून मी माझ्या नव्या ऑफिसची जबाबदारी स्वीकारणार आहे. म्हणून माझ्या मागील वीस वर्षाच्या मुखत्यारपदाचा

हिशेब तुम्हास सादर केला.

मुसलमान आणि अस्पृश्य हे अल्पसंख्यांक समजल्या जात असले तरी त्यांच्या परिस्थितीत भक्कम असे अंतर आहे हे स्पष्ट केलेच पाहिजे. आपल्या जातीच्या

मानाने मुसलमान जात अत्यंत श्रीमंत आहे. ' ब्रिटिश येईपर्यंत ते या देशाचे

राज्यकर्ते होते. अशा तऱ्हेने त्यांच्यामागे उच्च असा दर्जा आहेव

आपल्यापेक्षा त्यांची प्रगती कितीतरी अधिक झालेली आहे. शेकडो वर्षापासून

आपली पिळवणूक झालेली आहे. आत्यंतिक दारिद्रय ही आपली आर्थिक स्थिती

आहे. केवळ एकट्या लोकसंख्येवरून आपली तुलना आपण मुसलमानांशी करू

शकत नाही. पुर्णतः आपल्याच प्रयत्नांवर सुरुवातीपासून अवलंबून राहून

आपणाला कार्य केले पाहिजे. आपणाला आपल्या जातीचा उद्धार करावयाचा

आहे. माझ्या या नवीन नेमणुकीमुळे ही माझी जबाबदारी मला दुसऱ्याच्या ` खांद्यावर सोपवावी लागत आहे. अधिकारासंबधी (०1०७) मला मुळीच आवड

नाही, मी चांगला सुरळीत होतो. साध्या "डॉ. आंबेडकर' मध्ये आणि "नामदार

डॉ. आंबेडकर' मध्ये काही फरक आहे असे मला वाटत नाही. माझ्या

नेमणुकीसंबंधी अधिक महत्त्वाचे मला वाटते ते हे की गव्हर्नर जनरलच्या

एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर दलित वर्गाच्या प्रतिनिधीसाठी एक जागा ठेवलीच

पाहिजे अशी आता रूढी स्थिर झालेली आहे. ब्राह्मणशाहीला हा प्राणघातक

ठोसा आहे. माइया नेमणुकीचे महत्व येथे आहे. अशा तऱ्हेचा प्रघात पडणे

ब्राह्मणशाहीला मुळीच पथ्यकारक नाही. मला वाटते अस्पृश्यांचा हा फार मोठा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपादक-मा. फ.

माजा सयाद मा. फ. गाजरे, खंड एक, पुर्मुब्रण १९८६. खंड एक, पुनर्मुद्रण १९८६,

पृष्ठ ९२-९४.