२०-७-१९४२ ब्राह्मणशाहीला प्राणघातक ठोसा - Page 464

१९७

स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून

दिनांक २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुईमेन्स कॉन्फरन्स मध्ये महिलांना उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

या प्रसंगी तुमच्या परिषदेत बोलताना मला आनंद होत आहे. दलित वर्गाच्या प्रगतीची व कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाला हा स्त्रियांचा समुदाय पाहून जेवढा आनंद होईल त्यापेक्षा अधिक आनंद दुसऱ्या कोणत्याही प्रसंगी होणार नाही. तुम्ही इतक्या २० ते २५ हजारांच्या संख्येने येथे उपस्थित राहाल ही गोष्ट दहा वर्षापूर्वी कल्पना सुद्धा करण्यासारखी नव्हती. स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विशवास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्‍वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी। जाणतो. सामाजिक दोष नाहिसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनही हे मी सिद्ध करून देईन. दलित वर्गामध्ये काम करण्यास जेव्हापासून मी सुरुवात केली तेव्हापासून पुरुषांबरोबर स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत. म्हणूनच आपल्या परिषदा मिश्र परिषदा आहेत, असे तुम्हास दिसून येईल. स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो. म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केलेली आहे. तुम्ही मनात नीट जपून ठेवाव्या अशा काही थोड्याशा गोष्टी तुम्हास सांगतो.

स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा. तुमच्या मुलांना शिक्षण य़ा. हळू हळू त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हीनगंड नाहिसा करा. लग्न करण्याची घाई करू नका. लग्न म्हणजे जबाबदारी. लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार पाडण्याइतपत आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांच्यावर लग्न लादू नका. जे लग्न करतील त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अती जास्त मुले होणे हे दुष्ट कृत्य आहे. आपल्या लहाणपणी :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपादक-मा. फ. गांजरे, खंड एक, पुनर्मुद्रण १९८६, पृष्ठ-९४-९५.