२०-७-१९४२ स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून - Page 466

१९८

राजकीय समतेसाठी स्वतंत्र राजकीय [हक्कांची ]
आवश्यकता

नागपूर येथे समता सैनिक दलाला उद्देशून दिनांक २० जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

मध्यप्रदेशात उभारण्यात आलेले हे स्वंयसेवकांचे विस्तृत दल पाहून मला फार आनंद होत आहे. प्रथमतः हे स्वयंसेवकांचे विस्तृत दल १९२६ साली मुंबईत सुरू करण्यात आले होते. आपल्या सर्वमान्य चळवळीचा ' समता सैनिक दल ' हा एकसंघ असा विभाग आहे. खरेच, आपल्या चळवळीचे ते एक अत्यंत भक्कम असे साधन आहे. आता आपल्या चळवळीच्या ध्येय धोरणामध्ये पूर्णतः व मूलभूत असा बदल घडून आलेला आहे. अशी एक वेळ होती की हिंदू समाजाला जोडलेला एक घटक म्हणून हिंदू समाजात आम्हाला समतेचे स्थान प्राप्त करून घेणे आपले उद्दिष्ट होते. आज भारताच्या राष्ट्रीय जीवनात आम्ही वेगळा व स्वतंत्र घटक असून हिंदुंच्या बरोबरीचे आहोत अशी आपली विचारसरणी आहे. आपल्या चळवळीच्या ध्येय धोरणाबरोबर समता सैनिक दलाच्या ध्येय धोरणातही बदल झालेला आहे. या स्वंयसेवक संघटनेच्या उभारणीला मूलतः कोणते कारण असेल तर हिंदू समाजात समता मिळविण्यासाठी दलित वर्गाच्या मागण्यांना प्रोत्साहन देणे हेच होय. तिच्या नावातच सूचित असल्याप्रमाणे ही संघटना हिंदू समाजामध्ये दलित वर्गाला समतेचे स्थान प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती. आज हिंदूंपासून पूर्णतः विभक्त होऊन हिंदुंच्या बरोबर सामाजिक सत्ता हस्तगत करणे तिचे ध्येय आहे. हे धर्मातराद्वारे घडवून आणण्याची आपणास आशा आहे. आपणाला पायरी पायरीने पुढे गेले पाहिजे. स्वतंत्र राजकीय हक्क मागून प्रथम आपण राजकीय समतेची मागणी करावी व अशा तऱहेने आपले प्रयत्न सुरू केले पाहिजे. हे अत्यंत कठीण कर्म झाले होते, कारण आपल्या राजकीय मागण्यांना व्यक्‍त करण्यासाठी सुरक्षित असे सभास्थान दलित वर्गाला लाभू शकत नव्हते. एक काळ असा होता की हे पूर्णत: अशक्य होते. काँग्रेसची संघटना इतकी चढेल झाली होती की ती मुंबईमध्ये इतर कोणत्याही राजकीय पक्षाला सभा घेऊ देत नसे. सभा घेण्याचे कोणी धाडसच करीत नसे. काँग्रेसचे स्वयंसेवक येऊन अशा सभा उधळून लावीत असत. या दहशतीशी सामना देण्यासाठी आमच्या स्वयंसेवकांच्या मूळ कर्तव्यामध्ये आम्ही आणखी नवीन भर घातली. ती म्हणजे राजकारणात भाग घेऊन काँग्रेस स्वयंसेवकांच्या या जुलमी व अत्याचारी कृत्यापासून आपल्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपादक-मा. फ. गांजरे, खंड एक, पुनर्मुद्रण १९८६,

पृष्ठ-९५-९८.