राजकीय समतेसाठी स्वतंत्र राजकीय हक्कांची आवश्यकता ४२९
सभांचे रक्षण करणे हे होय. काँग्रेस स्वयंसेवकांच्या धमकीला तोंड देण्याची ही पद्धत अत्यंत कार्यक्षम ठरली.. मी गोलमेज परिषदेला जाण्याच्या तयारीत होतो तेव्हाचा प्रसंग अजून मला आठवतो. माझ्या गोलमेज परिषदेला जाण्यासंबंधी निंदा करण्यासाठी, मी राहत होतो त्याच्याजवळ दलित वर्गाच्या नावावर काँग्रेसने मुंबईमध्ये एक सार्वजनिक सभा घेतली होती. या सभेत दलित वर्गाचा मी खरा प्रतिनिधी नाही असे ते जाहीर करणार होते. त्या सभेच्या संघटकांना मी असे सांगितले की जर ही खरीखुरी दलित वर्गाचीच सभा होणार असेल तर त्यांनी कोणताही ठराव घेतला तरी मला मुळीच वाईट वाटणार नाही. परंतु ही तुमची सभा दलित वर्गाची नाही. परंतु आधीच योजून ठेवलेली कृत्ये बंद करण्यास त्यांनी नकार दिला. संध्याकाळी ही सभा भरविण्यात आली. परंतु ऐनवेळी आपल्या स्वयंसेवकांची एक तुकडी आली आणि काँग्रेसच्या स्वयंसेवकांची पूर्णतः दाणादाण करून त्यांनी सभा हस्तगत केली. खुर्ची, टेबल व कालबेल सोडून काँग्रेसच्या लोकांना जीव घेऊन पळावे लागले. ही खुर्ची, टेबल व बेल विजयाचे मानचिन्ह म्हणून आमचे स्वयंसेवक अखेर घेऊन आले. आमचा स्वयंसेवक संघ मुंबईत सर्वात बलवान आहे. आमच्या स्वयंसेवकांना आव्हान देण्याचे धाडस अजूनपावेतो कोणीही केले नाही.
आपल्या राजकीय चळवळी विनाछळणुकीशिवाय चालत आहेत याला जर काही कारण असेल तर ते म्हणजे आपल्या स्वयंसेवक संघाची शक्ती हेच होय. आपल्यावर त्यांचे कृतज्ञतेचे फार मोठे ऋण आहे. FE
` तुम्ही ही कल्पना मुंबईपासून उसनी घेतली पण संघाच्या विस्तारामध्ये मुंबईला कितीतरी मागे टाकलेले आहे, हे प्रत्यक्ष दिसत आहे. याबाबतीत तुमचे कौतुक करावेसे वाटते. तुमच्या पातळीवर येण्यासाठी मुंबईला स्वतःस खडखडीत जागे करून जोराचा प्रयत्न करावा लागणार आहे. स्वयंसेवकांच्या संघटनेच्या आवश्यकतेवर माझा पूर्णतः विश्वास आहे. ही संघटना चालू ठेवावी एवढेच नव्हे तर प्रत्येक प्रांतात तिच्या शाखा उघडाव्या व दलित वर्गातील प्रत्येक तरुण तिचा सभासद होईपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला पाहिजे. |
अशा स्वयंसेवकांच्या संघटनेला विरोध करणारे काही लोक आहेत. ते अहिंसेवर विश्वांस ठेवणारे म्हणंवितात आणि या संघटनांना व शक्तीच्या प्रदर्शनाला विरोध करतात. मी सुद्धा स्वतः अहिंसा तत्त्वाला शिरोधार्य मानणारा माणूस आहे. परंतु अहिंसा आणि लीनता यामध्ये मी फरक करतो. लीनता म्हणजे दुर्बलता आणि स्वतःच स्वतःवर दूर्बलता लादून घेणे हा काही सद्गुण नव्हे. एका उपनिषदामध्ये एका कोकराची एक गोष्ट आहे. ते देवाजवळ गेले
व त्याने तक्रार केली की, "देवा, तू सर्व प्राणीमात्रांचा बाप असल्यामुळे सर्व प्राणी
भाऊ-भाऊ आहेत परंतु असे असले तरी प्रत्येक प्राणी हे सर्व बंधूप्रेम विसरून
जाऊन मला खाऊ की गिळू असे करीत आहेत. हे. असे काय
म्हणून ?” कोकराने देवाला विचारले. देवाच्या तोंडी घातलेले उत्तर मोठे