१६-५-१९४३ तर व्यक्तीचा सुसंस्कृत व सुखी जीवन प्राप्त होण्याचा मूलभूत हक्क प्रस्थापित होईल - Page 474

२०१

. . तर व्यक्तिचा सुसंस्कृत [व ] सुखी [जीवन ]

प्राप्त होण्याचा मूलभूत हक्क प्रस्थापित होईल

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये भाषण करताना [डॉ. ] [बाबासाहेब ] [आंबेडकर ]

म्हणाले,

जगात चिरकाल शांतता नांदण्याचे वाटेत साम्राज्यलोभ, वर्णद्वेष आणि दारिद्रय हे तीन प्रचंड अडथळे आहेत. राष्ट्राचे सामर्थ्य वाढवणे हा पहिल्या दोन अडचणीवरील तोडगा आहे. दुबळ्या राष्ट्राला नेहमी गुलामगिरीतच राहावे लागते. म्हणून दुबळे देश सामर्थ्यवान झाले पाहिजेत. वर्णवर्चस्व हे पाश्चात्य राष्ट्रांच्या आर्थिक वर्चस्वातून निर्माण झालेले आहे. हिंदुस्थानाच्या सुप्त औद्योगिक आणि आर्थिक सामर्थ्याचा संपूर्ण विकास केला म्हणजे वर्णद्विषाचा प्रश्‍न दूर होईल. युद्धोत्तर जगात दारिद्र्याचा प्रश्‍न शिल्लक राहाणे शक्य नाही. औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडून येईल आणि त्यामुळे धनसंचय करण्याच्या हक्कापेक्षाही व्यक्तीचा सुसंस्कृत व सुखी जीवन मिळण्याचा मूलभूत हक्क आधी प्रस्थापित होईल.

नवयुग : १६ मे १९४३.

अंकात सभेची तारीख दर्शविलेली नाही--संपादक.