३०-१-१९४४ समता सेनिक दलाच्या शाखा सर्वत्र स्थापून आपली शक्ती वाढवा - Page 484

४४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ठराव नं. ६.--(अ) दलाची घटना तयार करण्यासाठी ही परिषद पुढील गृहस्थांची एक समिती नेमीत आहे. (१) श्री. बी. के. गायकवाड (अध्यक्ष), सभासद, (२) श्री. एम. एम. ससाळेकर, (३) श्री. एस. बी. जाधव, (४) श्री. आर. आर. पाटील, (५) श्री. के. एन. वाल्मिकी, (६) श्री. ए. एल. कोसारे, (७) श्री. पी. एल. लळिंगकर.

(ब) येत्या वर्षाकरता (१९४४-४५) पुढील गृहस्थांची वर्किंग कमिटी ही परिषद नेमीत आहे. (१) श्री. बी. के गायकवाड (अध्यक्ष, महाराष्ट्र) (२) श्री. एम. एम. ससाळेकर (जनरल सेक्रेटरी, मुंबई), (३) श्री. आर. आर. पाटील (असिस्टंट सेक्रेटरी, मध्यप्रांत). सभासदः-(४) श्री. के. एम. वाल्मिकी (संयुक्त प्रांत), (५) श्री. ए. एल. कोसारे (मध्यप्रांत), (६) श्री. पी. परमार (गुजरात), (७) श्री. एस. बी. जाधव (मुंबई). ज्या प्रांतांना प्रतिनिधित्व मिळाले नसेल, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी जरूर ते सभासद नेमण्याचा अधिकार ही परिषद वर्किंग कमिटीला देत आहे. वरील ठरावावर वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींची भाषणे झाल्यावर दुपारी दोन वाजता परिषदेचे अधिवेशन समाप्त झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.