२०५
इतर कुठल्याही जमातीपेक्षा अस्पृश्यांना
स्वातंत्र्याविषयी अधिक आस्था आहे
' निझामच्या हैद्राबाद संस्थानला बाबासाहेबांनी पहिली भेट दिनांक २० सप्टेंबर
१९४४ ला दिली ती अविस्मरणीयच म्हटली पाहिजे. ते दक्षिण भारताच्या दौऱ्यावर निघाले होते. मुंबईतील कार्यक्रम आटोपून हैद्राबादला गेले. त्यावेळी त्यांचे दोन ठिकाणी अपूर्व स्वागत झाले. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे नामपल्ली आणि दुसरे ठिकाण म्हणजे सिकंदराबाद ते हैद्राबाद. बेगमपेट रेल्वे स्टशनवर
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी [हैद्राबाद ] [संस्थानच्या ] [फेडरेशनचे ] [अध्यक्ष ] श्री. जे. सुबय्या, सौ. सुबय्या, श्रीमती राजमणी [देवी, ] [श्री. ] [माद्रे ] [इत्यादि ] [हजारो ] कार्यकर्ते उपस्थित होते. |
नामपल्लीच्या अपूर्व स्वागतात, पुरुषांपेक्षा स्त्रियांनी केलेले स्वागत उस्फूर्त होते. हैद्राबाद शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या पुरुष स्वयंसेवकांनी एकाच नमुन्याच्या बुश शर्टचे युनिफॉर्म चढविले होते. तर फेडरेशनच्या महिला स्वयंसेवकांनी विविधरंगी पोशाखाने सर्व नामपल्ली मढवून टाकली होती. त्यातून महिला स्वयंसेवकांनी स्वत:च जो शिस्तबद्ध बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे एकूण कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा बनला होता. परंतु यावरही कळस महिला स्वयंसेवकांनी केला होता. या स्वयंसेविकांच्या वतीनेच बाबासाहेबांना देण्यात आलेला गार्ड ऑफ ऑनर, व्हॉईसरॉयला मिळणाऱ्या गार्ड ऑफ ऑनरला मागे टाकणारा असा विलोभनीय दिसत होता. ' आंबेडकर झिंदाबाद ' च्या घोषणांनी
नामपल्ली परिसर नुसता दुमदुमून गेला होता. |
बाबासाहेबांचे रेल्वेचे खास सलून जेव्हा सिकंदराबादेत आले, तेव्हा त्यांच्या भेटीस अनेक थोरा मोठ्यांची रीघ लागलेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने, नबाब मैना, नबाब जंग बहाद्दूर, हैद्राबाद संस्थानचे पोलिटिकल एजंट व माहिती खात्याचे ऑफिसर, कॅप्टन डब्ल्यू. एफ. क्रॅशन्शन, रेसिडेंटचे ऑनररी अंडर सेक्रेटरी, छतारीच्या नबाबाचे ए. डी. सी. हेही भेटी देणाऱ्या अनेक मान्यवरांमध्ये होते. सिकंदराबाद रेल्वे स्टेशनपासून तर हजारो स्त्री पुरुषांची विराट मिरवणूक निघाली होती. सदर मिरवणूक, रस्ता काटीत काटीत, मार्केट स्ट्रीट वरुन, के. ई. एम्. रोड वरून किंग्जवेकडे आगेकूच करीत निघाली.