२०-९-१९४४ इतर कुठल्याही जमातीपेक्षा अस्पृश्यांना स्वातंत्र्याविषयी अधिक आस्था आहे - Page 490

४५० डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पुढे धनमंडीला मिरवणूक पोहोचल्यावर तर एकच तोबा गर्दी उसळली. अशी

अपूर्व मिरवणूक. त्यात बँडच्या संगिताचे झंकारच झंकार, एकामागून एक अशा

उठविल्या जाणाऱ्या ' आंबेडकर झिंदाबाद ' च्या घोषणांचे असंख्य ध्वनी-प्रतिध्वनी

आणि सर्व रस्त्यावर फडकत राहिलेल्या रंगी-बेरंगी पताका, या सर्वांची एकमेकात

जणू प्रचंड स्पर्धाच चालली होती. याशिवाय शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे

असंख्य ध्वज जिकडे तिकडे डौलाने फडकत होते.

बाबासाहेबांना अशा मिरवणुकीतून नेण्यात येत होते. सर्व सिकंदराबाद व

हेद्राबाद ही दोन्ही जुळी शहरे जणू एकत्र लोटली होती. प्रथमत: बाबासाहेबांना

' पाच-बंधु-सेवा-हाल ' मध्ये नेण्यात आले. हे जनतेची सेवा करणारे केंद्र

होते. कोणत्याही गोरगरीब मनुष्याचे काही गाऱ्हाणे असल्यास त्यास मोफत

सहाय्य करण्यासाठी सदर केंद्र उभारण्यात आल्याचे बाबासाहेबांना सांगण्याल

आले. या केंद्रानंतर मिरवणूक विस्तीर्ण अशा जीरा मैदानाकडे वळली. तेथे

भला मोठा मंडप उभारण्यात आला होता. सर्व मैदान तुडूंब भरून गेले होते. महिलांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी स्वागत समितीचे प्रमुख प्रेमकुमार यांनी बाबासाहेबांचे स्वागत केले तर शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या वतीने जे. एच. सुबय्या यांनी बाबासाहेबांना मानपत्र सादर केले.

बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास उठले तेव्हा त्या जनसागराने टाळ्यांची प्रचंड साथ दिली. बाबासाहेब सुमारे ४५ मिनिटे बोलले. हिंदुस्तानी. भाषेतून. परंतु त्यांनी सर्वे श्रोतृवर्गाला आपल्या भाषणाने मुग्ध करून टाकले' होते. बाबासाहेबांचे प्रभावी भाषण, हृदयास भिडणारी भाषा, गोरगरिबांशी एकरूप होणारी त्यांची प्रवृत्ती, शेड्यूल्ड कास्टस्‌ फेडरेशनच्या ध्येयाचा न्यायीपणा व त्यांची विद्वत्ता यामुळे, शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या झेंड्याखाली सर्वांना एकजुटीने अस्पृश्यांचे हक्क मिळविण्यासाठी कसे लढावे याचे त्यांचे विवेचन प्रत्येकाच्या हृदयास जाऊन भिडले."

“ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

अध्यक्ष महाराज व बंधु. भगिनींनो,

आज तुम्ही जे माझे प्रचंड प्रमाणात स्वागत केलेत त्याबद्दल मी आपला फार. आभारी आहे. गी आपल्याकडे पहिल्यांदाच आल्यामुळे आजच्या स्वागताची . अपेक्षा करीत नव्हतो. परंतु माझे आयुष्य व जीवनाकडे पाहिले म्हणजे ह्याप्रकारचे मला आश्चर्य वाटत नाही. |

* समग्र आंबेडकर चरित्र : बी. सी. कांबळे, खंड १७ वा. पू. ६६, ६७