२४-१-१९३७ ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेद- वारांना निवडून देऊ नका - Page 49

ज्यांना पक्ष नाही.....उमेदवारांना निवडून देऊ नका ११

` गाजविणाऱ्या त्या प्रचंड जनसमुदायातून स्वयंसेवकांनी साखळी करून मोटारीपर्यंत

बाबासाहेबांना मोठ्या प्रयासाने पोचविले. पुढे बाबासाहेब मेसर्स जी. आर.

देशपांडे वकील यांच्या बंगल्यावर मुक्कामास गेले व मंडळी 'आंबेडकर

झिंदाबाद' च्या ललकायया मारीत थोरल्या महारवाड्यातील मंडपात गेली.

चहापानानंतर बरोबर ८ वाजता बाबासाहेब मंडपात दाखल झाल्याबराबर

(झिंदाबादची घनगर्जना, टाळ्यांचा कडकडाट व एकदम शांतता) मातंग ` समाजातर्फे केरू रामचंद्र जाधव यांनी पुन्हा हार घालून "अखिल भारतीय

अस्पृश्य समाजाला शिक्षण, समता, सन्मान आणि भाकर मिळवून देण्यासाठी

स्वत:च्या प्राणाचीही पर्वा न करिता अत्यंत निर्भयतेने, समतेने आणि व्यापकतेने

बाबासाहेबांनी चालविलेली सनदशीर चळवळ ही खास आमचा उद्धार करील,

बाबासाहेब हेच आमचे पुढारी, हेच आमचे धर्माधिकारी व हेच आमचे पूज्य

दैवत आहेत आणि मातंग समाज त्यांचा एकनिष्ठ अनुयायी आहे ही गोष्ट

मुंबईत झालेल्या इलाखा मातंग परिषदेने सिद्ध केलेली आहे." वगैरे भाषण

केल्यावर बाबासाहेब बोलावयास उभे राहिले (झिंदाबादची गर्जना, प्रचंड

टाळ्या व एकदम शांतता).

डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

बंधूंनो व भगिनींनो,

मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या आगामी निवडणुकीत कोणाला मते देऊन

निवडून आणावे याचा विचार करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत.

या देशात अनेक राजे होऊन गेले व इंग्रजांना येथे येऊन उणीपुरी १५० वर्षे

झाली. इंग्रजांच्या या १५० वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे ६० वर्षांपासून ही

कौन्सिले अमलात आली असून त्यांच्याद्वारे जनेतेचे प्रतिनिधी आपल्या लोकांची

गाऱ्हाणी सरकारकडे मांडीत आहेत. परंतु अस्पृश्य मानिलेल्या ८ कोट प्रजेतर्फ त्यांचे गाऱ्हाणे मांडणारा त्यांचा प्रतिनिधी कौन्सिलात असावा ही गोष्ट आतापर्यंत जगाच्या इतिहासात घडून आली नव्हती. ती गोष्ट आता आपल्या प्रयत्नाने झाली आहे. येत्या एप्रिल १९३७ पासून सुरू होणाऱ्या कायदे मंडळासाठी सोलापूर जिल्ह्यातील आपल्या लोकांस एक प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार मिळाला आहे. आता जे कौन्सिल भरणार आहे, ते आपल्या समाजाच्या बचावाचे साधन आहे. तेथेच आपल्या सुखदुःखाची दाद लागणार आहे. तेथेच महाराच्या वतनासंबंधी, पडित जमिनी मिळण्यासंबंधी, शिक्षण संपादनासाठी, स्कालरशिपा मिळविण्यासंबंधी, अस्पृश्यतेमुळे आलेली दैन्यवस्था टाळण्यासंबंधी, सरकारी नोकरीत योग्य त्या प्रमाणात शिरकाव होण्यासंबंधी अशा एक ना दोन शेकडो गोष्टी या कायदे मंडळाच्या द्वारे झगडा करून आपणास मिळवावयाच्या आहेत. अर्थात तेथे जाणारा तुमचा प्रतिनिधी मानासाठी जाणारा