इतर कुठल्याही जमातीपेक्षा ....... आस्था आहे ४५१
` आजच्या स्वागतात, सभेत व मिरवणुकीत तरुणांनी जो उत्साह दाखविला
त्याबद्दल मला फार समाधान वाटते. आपल्या समाजाची मदार आजच्या तरुण
पिढीवर अवलंबून आहे. तरुण पिढीने आपल्या समाजाकरिता स्वार्थत्याग
केल्याशिवाय आपले उद्दिष्ट लवकर हस्तगत करता येणार नाही. येथे चळवळ
करण्याच्या सवलती असत्या तर तुमची फार प्रगती झाली असती, असे मला वाटते.
` आजच्या समारंभात स्त्रियांचा उत्साह पाहून तर मला विशेष वाटते. इथल्या
स्त्रिया चांगली भाषणे करू शकतात, असे माझ्या निदर्शनास आले आहे. इथल्या
स्त्रिया स्वच्छ राहावयास शिकल्या आहेत. समता सैनिक दलाची शाखा इथे
स्थापन करून स््त्रियांनीसुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे, त्याबद्दल फार समाधान वाटते. आजच्या प्रसंगी मला स्त्रियांना जो संदेश द्यावासा
ब्राटतो तो हा की, त्यांनी पुरुषांबरोबर सार्वजनिक आयुष्यात उतरले
प्राहिजे. घुरुषवर्ग पुढे जाऊन जर स्त्रिया पाठीमागे राहिल्या तर कुठल्याही
समाजाची प्रगती होणार नाही. गाडीचे एक चाक जर लुळे असेल तर गाडी
चालू शकत नाही. म्हणून स्त्रियांनी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून
लढले पाहिजे, म्हणजे आपले स्वातंत्र्य आपणाला लवकर मिळेल.
: आपल्या चळवळीचा अखेर कोठे आहे ? आपल्या समाजाला व देशाला
स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे आपले ध्येय आहे. पण या देशात अनेक पंथ
आहेत. (१) हिंदू, (२) मुस्लीम, (३) इसाई व (४) अस्पृश्य. अस्पृश्य
कोण आहेत ? अस्पृश्य जात ही हिंदुंपासून वेगळी आहे. हिंदू समाजाने
आ्ञापणाला हजारो वर्षापारून सामाजिक, आर्थिक, राजकीय बाबतीत गुलाम करून
टाकले आहे. गुलामगिरीचे बंधन आम्ही आता तोडू इच्छितो. असे टाहो
फोडून सांगण्यात येते की या देशाला प्रजासत्ताक राज्य पाहिजे. परंतु अस्पृश्य
वर्गाला वगळून प्रजासत्ताक राज्य होऊ शकते काय, हा माझा हिंदू समाजाला प्रश्न
आहे. प्रजासत्ताक राज्यात मुसलमानांना हक्क मिळतील, इसाई लोकांनासुद्धा
हक्क मिळतील पण आम्हाला हक्क मिळणार नाहीत, अशी हिंदुंची कारवाई चालू
आहे. परंतु आम्ही त्यांचे भाऊबंद नाही. आम्ही त्यांचे सगे नाही. हिंदू
संमाजावर विसंबून, ते आम्हाला हक्क देतील यावर आमचा विशवास बसूच शकत नाही. मि. जिना यांनी पूर्वी सर्व अल्पसंख्यांकांची बाजू धरली होती. पण त्यांनी आता मुस्लिम लीगच्या वतीने पाकिस्तानची मागणी केली व इतर अल्पसंख्यांक जमातीच्या हिताचा लढा सोडून दिला आहे. ते फक्त आता
(
जा,