आहे ४५७ मी केव्हाही लढावयास तयार . . . तर त्या स्वातंत्र्यासाठी
कायदे करावे लागतात व शेवटी सारा कार्यभार प्रांतिक सरकारला विचारूनच
आणि कारभार करणारे लोकच ज्या कायद्यांकडे प्रांतिक सरकारकडेच असतो
काही ढुंकून पाहायला तयार नाहीत ते कायदे अर्थात मध्यवर्ती सरकारने करण्यात हशील नाही. ह्या आमच्या अडचणी आहेत. सर्वांना हवी तेवढी आमची गती नसली तरी सरकारचे अंतःकरण काही अगदी दगडाचे नाही. कामगार
संबंधीच्या कायद्यांना निराळेच वळण देण्याचा विचार चालू आहे.
पुष्कळ लोक मध्यवर्ती सरकारवर टीका करतात. पण तसे करण्यात काही
आर्थ आहे काय ? मध्यवर्ती सरकारने फारसे काही केले नसेल. त्याचे माझ्या
मते एवढेसे महत्त्व नाही. शेवटी आजचे मध्यवर्ती सरकार काय करणार आणि
काय करणार नाही हा खरा खरा प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे की, ज्याला
आपण सर्व राष्ट्रीय सरकार म्हणतो ते त्याहून काही जास्त करणार आहे
का? माझे नम्र मत आहे की आज वाटतो त्याहून हा फार महत्त्वाचा प्रश्न
आहे. वादादाखल मी हे गृहीत धरण्यास तयार आहे की, आजचे मध्यवर्ती
सरकार हे केवळ तात्पुरते सरकार आहे. आपण सर्व राष्ट्रीय सरकारची . अपेक्षा करीत आहोत आणि सर्वात मला जास्त काळजी वाटत असेल ती याची
की, हे राष्ट्रीय ,सरकार आजच्या सरकारपेक्षा काही जास्त करणार आहे
काय ? याबद्दल मला थोडीशी शंका वाटते. आपण सर्व म्हणत आहोत की,
एकदा आमच्या हातात सत्ता आली, वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा
अधिकार मिळाला की, सगळ्या दुःखाचा अंत होईल आणि सर्व काही व्यवस्थित
होऊन प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून छाती पुढे काढून हमरस्त्यावरून फिरू
लागेल ! मला त्याबद्दल मोठी शंका वाटते. मी युरोपियन शासन पद्धतीचा
व पार्लमेंटरी राज्यव्यवस्थेचा पुरेसा अभ्यास केला आहे आणि सार्वत्रिक मतदान
अंमलात येऊन पार्लमेंटरी पद्धतीचे सरकार स्थापन होताच सर्व मानवी दुःखाचा
अंत होईल, असे जे जे कधी कधी म्हणण्यात येते, त्यावर माझा काडीइतकाही
विशवास नाही. अशा समजूतीला इतिहासाचा काहीच आधार नाही. खरी
गोष्ट अशी आहे की, सार्वजनिक मतदान असो की नसो, लोकमतानुवर्ती सरकार
असो की दुसरे कसलेही सरकार असो, प्रत्येक देशात, प्रत्येक समाजात दोन वर्ग
असतात, शासनकर्ता वर्ग आणि बहुजन समाज. हे भेद स्पष्ट असोत की अस्पष्ट
असोत त्याला काही महत्त्व नाही. तुम्ही सार्वजनिक मतदान अंमलात आणा,
शेवटी शासनकर्ता वर्ग अधिकारपदावर निवडून येणार ! बहुजन समाजाला मात्र
निवडून येण्याची कधीच आशा नाही. हे विधान मी बेजबाबदारपणे ठोकून देत
नाही. त्याला इतिहाससिद्ध आधार आहेत.