२३-९-१९४४ भारताच्या भावी राज्यघटनेत कामगारांच्या राजकीय हक्कांना प्राधान्य दिले पाहिजे - Page 500

४६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पृश्य मजूरांना उद्देशून बाबासाहेब म्हणाले, रेल्वे, पोस्ट आणि तारयंत्र खात्यात १३ टक्के जागा राखण्याचे मध्यवर्ती सरकारने ठरविलेले आहे. पण अस्पृश्य वर्गाच्या शिक्षणाची प्रगती पाहाता आठ पूर्णांक एक तृतियांश टक्के जागा अस्पृश्य वर्गाच्या वाट्याला येतात. तरी अस्पृश्य वर्गात शिक्षणाची प्रगती झपाट्याने व्हावी आणि या १३ टक्केवारीचा भरपूर फायदा समाजाला

मिळावा.