२०९
आपल्या धार्मिक, सामाजिक [व ] [राजकीय ]
आयुष्याचा पाया बुद्धिवाद [हाच ] [असला ] [पाहिजे ]
तारीख २४ सप्टेंबर १९४४ रोजी सकाळी १० वाजता मद्रास येथे प्रभात टॉकीजमध्ये रॅशनल सोसायटीच्या विद्यमाने, श्री. एस. रामनाथ यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात
म्हणाले, |
अध्यक्ष महाराज, बंधु आणि भगिनींनो,
मी नुसता राजकारणी असल्यामुळे वाङ्मय, इतिहास व तत्त्वज्ञान यावर अधिकाराने बोलू शकत नाही. पण मी वाङ्मय, इतिहास व तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून जे मत बनविले, ते आज तुम्हाला सांगणार आहे.
हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी पुष्कळ गैरसमज रुढ आहेत. पुष्कळ विद्वान इतिहासकारांनी म्हटले आहे की, हिंदुस्थानात राजकारणाचा काही गंधच नव्हता. प्राचीन भारतीयांनी केवळ तत्त्वज्ञान, धर्म व अध्यात्म याविषयी
हिंदी इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी एक मूलभूत गोष्ट-ज्याचा इतिहासकारांना साफ
विसर पडलेला दिसतो-नेहमी ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे प्राचीन
हिंदुस्थानात घडलेला बौद्ध व ब्राह्मण यामधील लढा. याचा इतिहास काही
प्रोफेसरांनी म्हटल्याप्रमाणे हा केवळ एखादा पंथामधला मामुली लढा नव्हता. सत्य
म्हणजे काय यासाठी तो लढा होता.
जनता : ९ डिसेंबर १९४४.