२४-९-१९४४ सत्तेवर असूनही ब्राह्मणेतर पक्षाला ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही - Page 505

सत्तेवर असूनही ब्राह्मणेतर . . . . आले नाही ४६५

बंधु भगिनींनो,

ब्राह्मणेतर पक्षाचे सुशिक्षित तरुण येथे आलेले असते व त्यांच्यापुढे आपणास एखाद्या तत्त्वज्ञान्याप्रमाणे विद्वताप्रचूर भाषण करावे लागले असते तर तसे करण्यात मला उत्साहही वाटला असता पण येथे नवविचारांच्या तरुणांपेक्षा जुने पुढारी व कार्यकर्ते जास्त संख्येने असलेले पाहून माझ्या उत्साहावर पाणी पडले

आहे. तरी पण मी माझे विचार तुमच्यापुढे मांडतो.

मद्रास ब्राह्मणेतर पक्ष, जस्टीस पार्टी, १९१७ ते १९३७ पर्यंत या इलाख्यात वीस वर्षे अधिकारावर होता. असे असताही तो पक्ष १९३७ च्या निवडणुकीत का पडला ? हा प्रश्‍न विचारण्यासारखा आहे. ब्राह्मणेतर पक्ष निर्माण झाला, ही एक लोकशाहीच्या दृष्टीने मोठी महत्त्वाची ऐतिहासिक घटना होय. ती फार

महत्वाची आहे. ब्राह्मणेतर या शब्दाने त्याला जातीयवादी स्वरूप प्राप्त

झाले. हा पक्ष लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हिंदू समाजात ब्राह्मण _व ब्राह्मणेतर असे दोन वर्ग हजारो वर्षे अस्तित्त्वात आहेत. ब्राह्मणवर्ग विषमता मानतो. त्याच्या हातात धार्मिक व राजकीय सत्ता हजारो वर्षे अनियंत्रितपणे

चालू आहे. ब्राह्मणेतर वर्ग समतेचा पुरस्कर्ता आहे. त्याने हुकूमशहा ब्राह्मणवर्गावर आतापर्यंत हजारो वेळा निकराचे हल्ले केले, ते समाजात समता

निर्माण करण्यासाठी. पण हुकूमशहा ब्राह्मणवर्ग धार्मिक, सामाजिक व राजकीय

क्षेत्रातील मोक्याच्या सर्व जागा बळकावून बसलेला असल्यामुळे ब्राह्मणेतर

पक्षाचे सर्व हल्ले त्याने नेस्तनाबूद केले. त्यामुळे ब्राह्मणवर्ग हा ब्राह्मणेतर

वर्गाचा अनियंत्रित राज्यकर्ता म्हणून अद्याप तसाच राहिलेला आहे. ब्राह्मणेतर

वर्ग समतेचा पुरस्कर्ता आहे पण त्याला विषमतेच्या पुरस्कर्त्या ब्राह्मणवर्गाला नेस्तनाबूद करून समाजात समता आणि देशात लोकशाही स्थापन करता आली

नाही.

ब्राह्मणेतर पक्ष या इलाख्यात वीस वर्षे सत्तारूढ होता तरी त्याला ब्राह्मणवर्गाला नेस्तनाबूद करता आले नाही, याची अनेक कारणे आहेत. . त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे या पक्षातील लोकांचा स्वार्थाधपणा, गतानुगतिकत्वाची ओढ, . सुशिक्षित ब्राह्मणेतरांची समाजापासून अलिप्त राहण्याची प्रवृत्ती, पक्षातील ध्येय धोरणांचा संकुचितपणा आणि संघटनेतील शिथिलता ही होत. हा पक्ष १९१७ ते १९३७ या वीस वर्षात सत्तारूढ झाला. पण त्याला जनतेच्या हिताचे कार्य करण्यापेक्षा ब्राह्मणवर्गाला शिव्याशाप देणे हेच जास्त महत्त्वाचे वाटले. त्यातच त्या पक्षाची सारी शक्ती खर्च झाली. खेडेगावातील जनता दारिक्र्याने पीडलेली आहे, ती सावकारांच्या पाशात अडकलेली आहे. तिच्या हितासाठी उद्योगधंदे काढणे. सावकारांच्या तावडीतून तिला सोडविणे वगैरे कार्य करण्याचे भान या पक्षाला राहिले नाही. आपल्या नातलगांना नोकऱ्या देणे, हेच मुख्य कार्य या पक्षाने केले. नोकऱ्यावर लावलेले तरूण ब्राह्मणेतर समाजापासून अलिप्त राहून