शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा ४६९
| दुसरे मोठे राजकारणी धुरंधरदेखील त्या मागणीच्या जवळ आले नव्हते. पण
| गांधींनी काय केले ते सांगण्यास मला दुःखच वाटते. परंतु ज्याअर्थी मी गोलमेज
परिषदेत ' संघ फोडण्याचे ' काम केले असा माझ्यावर नेहमी आरोप करण्यात
येतो त्याअर्थी मला काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत.
__ अर्थात गांधींनी स्वातंत्र्याच्या मागणीचे गाठोडे बरोबर आणल्यामुळे ते आमच्या
मागणीच्या पुष्कळच पुढे जातील, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु आश्चर्य हे
की हिंदुस्थानच्या दुर्दैवाने या म्हाताऱ्याला असे काही खेळविण्यात आले की त्याने
सायमन कमिशनच्या शिफारशीवरच संतुष्ट होण्याची तयारी दर्शविली. अर्थात त्यामुळे त्यावेळचे भारतमंत्री सर सॅम्युअल होअर व अधिकारारूढ असलेली
कॉन्झर्व्हटिव्ह पार्टी यांना परिषद संपविण्याची घाई झाली. पार्लमेन्टमधील
कॉन्झर्व्हेटिव्ह, लेबर व लिबरल् या तीन पक्षांचे एक कमिशन त्यावेळी आम्ही नेमले
होते. पार्लमेन्टने सायमन कमिशनच्या शिफारशी मान्य कराव्यात, त्यापलिकडे
जाऊ नये, याकडे आपल्या मानाचा प्रश्न म्हणून सर सॅम्युअल होअर पाहात
होते. त्यांना गांधींचे हे धोरण म्हणजे ईश्वरी प्रसादच वाटला. त्यांनी लगेच
बोलावयास सुरवात केली की गांधींहून मोठा माणूस हिंदुस्थानात आहे तरी
कोण ? सप्रू कोण आहेत ? आंबेडकर कोणत्या झाडाचा पाला ? आणि
जिना तरी कोठले आले ? गांधींचे जर प्रांतिक स्वायत्ततेने समाधान होते तर
परिषदा बंद कराव्यात व लगेच पार्लमेन्टने सायमन कमिशनच्या सांगण्याप्रमाणे
कायदा करावा. त्या विरूद्ध आवाज आम्हीच उठविला. आम्ही स्पष्ट
सांगितले की, आम्हाला हे मुळीच मान्य नाही व असल्या गोष्टीत आम्ही कधीही
साशीदार होऊ शकत नाही. आम्ही एवढी ओरड केली की शेवटी ब्रिटिश
मंत्रिमंडळाला परिषदेतील प्रतिनिधींची मते अजमावण्यासाठी एक छोटीशी
कॅबिनेट कमेटी नेमणे भाग पडले. या कमिटीपुढे साक्ष देणाऱ्यांपैकी मी एक
होतो. कमिटीचे अध्यक्ष लॉर्ड चँसेलर व सभासद, मुख्य प्रधान व भारत मंत्री
हे होते. मला सांगण्यास मोठा अभिमान वाटतो की अस्पृश्य वर्गालादेखील
पार्लमेन्टने मागे पाऊल टाकलेले सहन होणार नाही हेच मी सांगितले. माझे
हे कृत्य निंद्य होते असे कोणी म्हणू शकेल ? मध्यवर्ती सरकार लोकमतानुवर्ती
करण्यात अस्युंश्यवर्ग विरूद्ध आला असे कोणीतरी म्हणेल काय ?
त्यावेळी गांधींनी संस्थानिकांपुढे लोटांगण घातले. सरळ सांगितले की
संस्थानिकांनी प्रतिनिधींची पसंती करण्यात त्यांची काहीच हरकत नाही. सबंध
गोलमेज परिषदेत या प्रश्नावर झगडणारा मी एकटाच प्रतिनिधी होतो. (टाळया)
नामदार शास्त्री त्यावेळी कोठे दडले होते ? त्यांच्याविषयी काही गमतीच्या