२४-१-१९३७ ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेद- वारांना निवडून देऊ नका - Page 51

ज्यांना पक्ष नाही.....उमेदवारांना निवडून देऊ नका १३

शेवटी तुम्हाला सांगावयाची गोष्ट ही की, या शहरातील मजुरांच्या तर्फे

तुम्हाला एक मत देण्याचा अधिकार आहे. त्या जागेसाठी मजुरांच्या तर्फे

श्री. रघुनाथराव बखले हे उभे राहिले आहेत. आतापर्यंत त्यांनी कौन्सिलात केलेली गोरगरीब, मजूर, शेतकरी, अस्पृश्य यांची सेवा मला मान्य आहे. त्यांनाच सोलापूरच्या मजुरांनी मते द्यावी. शेठ सावकार, गिरणीवाले यांच्या ` हस्तकांना मते देऊन तुमचे कल्याण होणार नाही. तरी श्री. बखले यांनाच

आपली मते द्या

इतके बोलून बाबासाहेबांनी आपले भाषण पुरे केल्यावर तुळजापूरचे कदम

ब्रदर्स यांनी व इतर अनेकांनी हार घातल्यावर जयजयकारात सभा बरखास्त

होऊन बाबासाहेब मंढूपकडे रवाना झाले.

मंदूपची सभा

सोलापूरचा कार्यक्रम संपवून बाबासाहेब येथे येणार म्हणून मंढूप परगणा व

मंगळवेढे संस्थानातून जमलेला दोन हजारांवर लोकांचा समुदाय वाद्य-वाजंत्र्यांसह

आतुरतेने गावाबाहेर उभा होता. १० च्या सुमारास बाबासाहेबांची मोटार येऊन

थडकली व 'आंबेडकर झिंदाबादची' दंगल उडाली. बाबासाहेब मिरवणुकीने

मंडपाजवळ येताक्षणी सुवासिनी बायांनी त्यांच्या चरणाजवळ पाण्याच्या घागरी

ओतल्या. कापूर लावून नारळ फोडले व पंचारत्या घेऊन 'इडा पिडा जावो,

बाबासाहेब यशस्वी होवो' म्हणून ओवाळणी केल्यावर सभेच्या कामास सुरवात

झाली. प्रथम मंढूप. परगण्याचे देशमेहत्रे गंगापा रणखांबे यांनी स्वागतपर

भाषण केले व बाबासाहेबांनी थोड्या-बहुत फरकाने सोलापूरच्या सभेप्रमाणे

भाषण केले. श्री. ऐदाळे यांस मते देण्याचे सांगितले. नंतर भीमाप्पा रणखांबे

यांनी श्रीमंत देशगुख, श्री. पांढरे आणि राभाजन यांचे आभार गानले व

बाबासाहेबांच्या जयजयकारात सभा खलास झाली. नंतर बाबासाहेब सोलापुरकडे

परतले. तेथे धाकटा महारवाडा आंबेडकर तालमीची पानसुपारी उभ्या उभी स्वीकारून लागलेच ते वळसंगकडे रवाना झाले.

वळसंगची सभा

वाटेत कुंभारीकर योगीबुवा आणि समस्त मंडळी यांनी आपल्या चावडीसमोर

मुद्दाम उभारलेल्या मंडपात केलेली पानसुपारी हारतुरे घेऊन ११-२५ च्या

सुमारास बाबासाहेब वळसंगला पोचले. तेथेही वळसंग कुंभारी, सलगर,

मंगळूर भागातून व अक्कलकोट संस्थानातून तीन हजारावर लोकसमुदाय जमला होता. नंतर तेथील कारभारी श्री. ओंकारप्पा वळसंगकर यांनी स्वागत केल्यावर बाबासाहेबांनी थोड्याबहुत फरकाने सोलापूरप्रमाणेच भाषण करून ऐदाळे यास मते देण्यास सांगितले. नंतर सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने बांधून दिलेल्या विहिरीतून पाणी काढण्याबद्दल लोकांनी विनंती केल्यावरून