२४-९-१९४४ शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा - Page 514

४७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

घटक नाही. गोलमेज परिषदेत सरकारने त्यांना वेगळे प्रतिनिधीत्व का

दिले ? अस्पृश्य समाज म्हणजे हिंदुंची एखादी शाखा किंवा जात नाही. तो

एक स्वतंत्र घटक आहे. म्हणूनच त्याचे स्वतंत्र प्रतिनिधी घेण्यात आले

होते. त्याचप्रमाणे जॉईंट पार्लमेन्टरी कमिटीचा रिपोर्ट पाहा. हा सारा जुना

इतिहास आहे. त्यानंतर कितीतरी गोष्टी घडलेल्या आहेत. अस्पृश्य समाज

स्वतंत्र घटक आहे.

मला माझ्या हिदुबांधवांना स्पष्ट सांगावयाचे आहे की त्यांनी ह्या सर्व जुन्या कल्पना आता टाकून द्याव्यात आणि बऱ्यासाठी म्हणा अथवा वाईटासाठी म्हणा, अस्पृश्य समाज हा हिंदुस्थानचा एक स्वतंत्र घटक आहे, याची त्यांनी आपल्या मनाशी खूणगाठ बांधावी. मला त्यांना अगदी स्पष्टपणे सांगावयाचे आहे की, याबद्दल त्यांनी कसलीही शंका ठेवू नये.

गांधी-जिनांच्या वाटाघाटीतील मुख्य प्रश्नाबद्दल मला काहीच सांगावयाचे नाही. लोक मला विचारतात तुम्ही गांधी-जिना वाटाघाटीविषयी काहीच का बोलत नाही ? या वाटाघाटीविषयी काय म्हणावे तेच मला कळत नाही.

आता चालला आहे तसा फक्त दोन पक्षांमधील तडजोडीचा प्रयत्न केव्हाही संशयास्पद आहे. तिसऱ्याला लुबाडून स्वतःचा फायदा करून घेण्याचा हा दोघांचा डाव असल्यासारखे मला वाटते. गांधींकडून जिनांना काय हवे आहे आणि गांधी काय द्यावयाला तयार आहेत, हे मला माहीत नाही. पण जिनांना योग्य त्याहून जर काही जास्त गांधींनी दिले तर ते माझ्या वाट्यातून देतील अशी भीती वाटते. तेव्हा या वाटाघाटीमुळे मला एवढी काळजी का वाटते ते तुम्हाला सहज कळेल. देशातील सर्वात मोठ्या पक्षाचा पाठिंबा मिळवून कॉग्रेसची ताकद वाढविणे व त्याच्या जोरावर ब्रिटिश सरकारला घाबरवून अस्पृश्यांच्या मागण्या डावलून तडजोड करण्यास भाग पाडणे, हा गांधीच्या धोरणाचा सर्वात मोठा भाग आहे.

जातीय प्रश्‍न क्षितिजावर दिसू लागल्यापासून आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये गांधींनी जर काही केले असेल तर ते अस्पृश्यांकडे दुर्लक्ष करणे हेच होय.

गोलमेज परिषदेत मला एकटा वेगळा पाडण्याचा गांधींनी खूप प्रयत्न केला. हिटलरच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे मला त्यांनी चौफेर घेरून घेतले. मला एकटा करून माझा सर्व पाठिंबा नाहिसा करण्याचा त्यांनी प्रयत्न