२१२
युद्धानंतर हुकूमशाही प्रस्थापित होता कामा नये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मद्रासहून राजमहेंद्रीकडे जाण्यासाठी सोमवारी रात्री
२५ सप्टेंबर १९४४ ला निघाले. ते द्वारपौडी स्टेशनला मद्रास मेलने मंगळवारी २६ सप्टेंबर १९४४ ला सकाळी येऊन पोहोचले. तेथून ते मोटारीने रामचंद्रपूरला आले. तेथे अस्पृश्यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून त्यांची मोटार कोकीनाडाकडे निघाली, रस्त्यात वेलंगी या गावच्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांना मानपत्र दिले. संध्याकाळी ते कोकीनाडाला पोहोचले. तेथे त्यांना ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्ट बोर्डातर्फे मानपत्र दिले. . बोर्डाचे अध्यक्ष राय बहादूर बी. बी. सर्वेरायडू हे मानपत्रसमारंभाचे अध्यक्ष होते. मानपत्राला उत्तर देताना बाबासाहेबांनी भारताची सध्याची परिस्थिती व तीत देशाचे हिताचे धोरण कोणते याबद्दल भाषण केले. ते म्हणाले,
युद्धाला बिनशर्त मदत करणे, सशर्त मदत करणे, काहीच मदत न करणे आणि युद्धाला विरोध करणे असे विचारप्रवाह भारतात चालू आहेत. यामुळे देशातील राजकीय परिस्थितीत मोठा गोंधळ उत्पन्न झालेला आहे. युद्धाकडे पाहाण्याची निरनिराळ्या पक्षांची व पुढाऱ्यांची दृष्टी वेगवेगळी आहे. हे युद्ध आमचे नव्हे, . यात ब्रिटिशांचा पराजय झाला तर बरेच वगैरे उद्गार हे पक्ष व पुढारी काढतात. पण ही त्यांची भूमिका चुकीची आहे. ब्रिटिशांचे राज्य संपून भारतात जपान अगर जर्मनी यांचे राज्य सुरू झाले तर भारतातील सर्व लोकांना पशुसमान जीवन घालवावे लागेल. ब्रिटिशांनी भारतावर अनेक अन्याय केलेले आहेत व त्याविरुद्ध भारतीयांना, चळवळ करण्याची व बोलण्याची घटनात्मक स्वतंत्रता होती व आहे. परंतु जपान अगर जर्मनीच्या हुकूमशाही राज्यांमध्ये हे स्वातंत्र्य उपभोगायला मिळणार नाही. युद्ध संपल्यानंतर भारताला जादा हक्क नक्की मिळतील व ते हक्क मिळवण्यासाठी युद्धात जपान व जर्मनी यांचा पाडाव करण्यासाठी भारतातील सर्व पक्षांनी हातभार लावणे आपल्याच हिताचे आहे. या बाबतीत 'छोडो भारत चळवळ करून युद्धाला उपयुक्त प्रयत्न. जे होतात ते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र : ले. चां. भ. खैरमोडे, खंड ९, पृ. ३९२-९३.