२६-९-१९४४ युद्धानंतर हुकूमशाही प्रस्थापित होता कामा नये - Page 517

युद्धानंतर हुकूमशाही प्रस्थापित होता कामा नये ४७७

गुप्तपणे हाणून पाडण्याचे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना त्यांना सरकारने तुरुंगात डांबले, यात सरकारकडून अन्याय झालेला नाही. जीना आणि गांधी यांच्यात जी तडजोड व्हावी असे लोकांना वाटते तेवढ्या तडजोडीवरून भारताचे राजकीय प्रश्‍न सुटणार नाहीत. अस्पृश्य, हिंदू , मुसलमान वगैरे सर्व वर्गातील व पक्षातील लोकांनी एकत्र बसून हे प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न करावे.