२६-९-१९४४ ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणी जातिभेदाच्या विषाने मानवी सद्गुणांना मुकले - Page 518

२१३
ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणी जातीभेदाच्या विषाने
मानवी सद्गुणांना मुकले

दिनांक २६ सप्टेंबर १९४४ रोजी संध्याकाळी कोकीनाडा येथील शेड्यूल्ड कास्द्स्‌ फेडरेशन, रचुपेटे डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, वर्मा आंध्र इव्ह्युक्यूज असोसिएशन, वलंदरपेटा, आदि आंध्र असोसिएशन आणि प्रबोधन साहित्य समिती या संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पी. आर. कॉलेज हॉल मध्ये मानपत्रे देण्यात आली. त्यांना उत्तर देताना बाबासाहेबांनी भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

बंधुंनो आणि भगिनींनो,

कोणताही वर्ग अगर कोणतीही जात एखाद्या देशाच्या समाजात प्रभुत्व गाजवणारी का होते? त्या वर्गाच्या अगर्‌ जातीच्या हातात सत्ता असते म्हणून. मग ती सत्ता आर्थिक, धार्मिक, राजकीय अगर इतर कसलीही असो.. ब्राह्मणांनी हे पाचसहा हजार वर्षापूर्वी ओळखले. म्हणून ब्राह्मण लोक आपली जात सर्व हिंदू समाजाच्या डोक्यावर मिऱया वाटणारी कशी करता येईल याबद्दल विचार करीत होते,. त्यासाठी त्यांनी वेदात चातुर्वर्ण्याची उत्पत्ती केली. समाजाचा प्रमुख, देवळांचा प्रमुख, गावांचा प्रमुख ब्राह्मणच असला पाहिजे. ब्राह्मणाला सर्व जातीच्या बायका करता याव्यात, त्याला आपला मुख्य प्रधान, पुरोहित, सेनानी राजाने करावे वगैरे नियम मनू व इतर धर्मशास्त्रकार यांनी आपापल्या स्मृतीग्रंथात तयार करून ते हिंदू समाजाच्या बोकांडी मारले. ब्राह्मणांचे हे श्रेष्ठत्व हाणून पाडण्यासाठी ब्राह्मणेतरांनी वैदिक काळात व नंतर एकंदर सात मोठे झगडे केले. ब्राह्मण मुठभर व ब्राह्मणेतर लाखोनी मोजता येतील असे असता या झगड्यात ब्राह्मणेतरांना हार खावी लागली. कारण ब्राह्मणेतर लोक हे ब्राह्मणी जातीभेदाच्या विषाने मानवी सद्गुणांना मुकलेले होते. तेव्हा अस्पृश्य वर्ग जर सामर्थ्यशाली व्हावयाचा असेल तर त्याच्या हातात राजकीय व आर्थिक सत्ता आली पाहिजे. राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा

डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : लेखक चां. भ. खैरमोडे, खंड ९, पु. ३९३-९४.