ब्राम्हणेतर लोक . . . . सद्गुणांना मुकले ४७९
सध्या अस्पृश्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना अशी संधी गेल्या हजारो क्र्षात मिळाली नाही. या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी आपापसातील क्षतभेद सोडून द्यावेत व शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनमध्ये सामील व्हावे. तुम्ही भमृजकीय सत्ता काबीज केली की, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सत्ता पिळवण्याचे मार्ग तुम्हाला मोकळे होतील.
` मात्र या मार्गत एक मोठी मानसिक अडचण आहे. गांधी व काँग्रेस यांनी हरिजन सेवक संघातफे अस्पृश्यातील लहानथोर विद्यार्थ्याव्यतिरिक्त इतरांना श्ार्थिक मदत देण्याचे सत्र सुरू केले. यात त्यांचा हेतू पवित्र नसून दुष्ट ह्रहे. त्यांना माहित आहे की, आपल्या पैशाने हे लोक मिंधे होतील व आपल्या क्षजूने राहून, ' ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी ' या न्यायाने हँग्रेसच्या चळवळीला उचलून धरतील. महाभारतातील पांडवांची बाजू ॥ायाची व कौरवांची अन्यायाची होती हे माहीत असूनही भीष्म व द्रोण हे कौरवांचे ब्रैठ खाणारे होते म्हणून त्यांनी कौरवांना सहाय्य केले व शेवटी त्यांचा सत्यानाश 'ज्ञाला. त्याचप्रमाणे हरिजन म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांची परिस्थिती होणार श्वे. म्हणून मी आमच्या तरूण विद्यार्थ्यांना धोक्याची सूचना देतो की, या क्षापळ्यात अडकून पडू नका. माझ्या इशाऱ्याचे तुम्हाला प्रत्यंतर पाहावयाचे क्रसेल तर तुम्ही हरिजन सेवक संघवाले, अगर काँग्रेसवाले हिंदू किंवा गांधी यांना श्षामाजिक समतेची मागणी करून पाहा. ते तुम्हाला दटावून गप्प बसायला
ज्लावतील हे मी नक्की सांगू शकतो.