पक्षांच्या व जातींच्या हार्दिक सहकार्यानेच राजकीय पेच सुटतील ४८१
दूरदृष्टी ज्या देशात नाही त्याचा सत्यानाश होतो असे जुन्या करारात एक वचन आहे. गांधाँच्या संबंधात त्याची आठवण होते. शिवाय गांधींजवळ संपूर्ण स्वातंत्र्याची आच नाही. गांधींचा तुलना कधी कधी अब्राहम लिकनशी करण्यात येते. लिकन हा प्रथम संयुक्त राष्ट्र कसे उभारता येईल हे महत्वाचे मानीत होता. त्याच्या निर्मितीसाठी निग्नोंची गुलामगिरी ठेवणे अगर नष्ट करणे हे त्या निर्मितीच्या प्रश्नावर अवलंबून असावे, असे मानीत होता व त्याप्रमाणे त्याने प्रथम गुलामगिरी नष्ट करण्याचे नाकारले व काही वर्षांनी म्हणजें १८६३ साली त्यांनी गुलामगिरी नष्ट केल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. कारण गुलामांचा उपयोग लढाया जिकून युनियन अभंग ठेवणे, हे त्याला जरुरीच वाटले. गांधींचेही असेच आहे. त्यांना स्वातंत्र्य हवे, पण वर्णाश्रमही हवा. समाजात संपूर्ण समता त्यांना नको आहे. अशा वृत्तीच्या पुढाऱ्यांजवळ दूरदृष्टी कशी असणार ? स्वातंत्र्याचा प्रश्न निघाला की अल्पसंख्यांक जाती आपापल्या संरक्षणासाठी जादा राजकीय हक्क मागतात. असले हक्क मागणे म्हणजे राष्ट्रद्रोह - होय, अशी भावना गांधी व काँग्रेस यांनी देशांत पसरविली आहे. भारताला स्वतंत्र करण्यासाठी १८८५ मध्यै काँग्रेस उत्पन्न झाली. पण गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसने पाकिस्तानचा प्रश्न उत्पन्न केलेला आहे
अशा परिस्थितीत भारताचे राजकीय पेच कसे सुटणार ? ते फक्त पक्षांच्या व जातींच्या हार्दिक सहकार्यानेच सुटतील