बुद्धाच्या वेदांवरील हल्ल्यामुळेच . . . . ते राज्यकर्ते झाले ४८३
मी गीता न वाचता टीका करतो अशी टीका केली जाते. पण ती टीका खोटी
| आहे. गेली पंधरा वर्ष गीतेचा अभ्यास केल्यावरच माझी मते मांडण्यास मी
सुरवात केली.
गीतेत विशेष असे काही नाही. तीत प्रामुख्याने तीन गोष्टी सांगितल्या
। आहेत. मरणे, मारणे, हिंसा करणे पाप आहे काय, वर्णाश्रम धर्माची महती व
` भक्तीने मोक्ष मिळेल, ह्या त्या तीन गोष्टी होत. गीतेचा अभ्यास करताना निव्वळ
, गीता पुस्तकावर अवलंबून गीतेचा अर्थ कळणार नाही तर त्या कालीन इतर ` वाडमयाचाही अभ्यास करून गीतेचा अर्थ लावला पाहिजे.
| या देशाचा पूर्वीचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ दोन हजार ` ववर्ष ब्राह्मणवर्ग व बुद्धधर्म यांचा वाद चालू होता. या वादात जे वाङ्मय निर्माण
झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील
सत्ताकेन्द्रावर आपली हुकूमत चालावी म्हणूंन गीता ग्रंथाचा जन्म झाला.
वेदातील थोडाफार अनुवाद गीता ग्रंथात करण्यात आला आहे. परंतु वेदात
तरी असे कोणते ज्ञान साठविले आहे ? खरे पाहिले तर वेद दोनच आहेत. एक
ऋग्वेद व दुसरा अथर्ववेद. मी वेद किती तरी वेळा वाचले आहेत. त्यात
समाजाच्या किंवा मानवाच्या उन्नतीसाठी व नीतिमत्तेस पोषक असे काही
सांगितलेले नाही. अथर्ववेदात, बायको प्रेम करीत नसली तर काय करावे,
दुसऱ्याची बायको कशी वश करावी, द्रव्यहरण कसे करावे हे सांगितले असून
जारण मारणादी गोष्टींचाही उल्लेख आहे. वास्तविक वेदांसारख्या ग्रंथात या
विषयांची काय जरुरी होती ? यातील पुरुष सूक्तात ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत
कोणी कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याचबाबत कटाक्ष होता व त्याच दृष्टीने
चातुर्वर्ण्याबद्दल त्यांनी टीका केली आहे. क्रियांनी मारणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
असे सांगितले आहे. एकाने दुसऱ्याला मारणे हे जरुरीही असू शकेल, पण
कर्तव्य ठरणार नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात १८ ते ३९ श्लोकात वेदान्ताचा
आधार घेऊन आत्मा अविनाशी आहे, देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहिसा
होणारच, असेच विवरण केलेले आढळेल. परंतु विचार करा की एखाद्या खुनी
खटल्यात वकिलाने जज्जास असे सांगितले की 'साहेब आत्मा अविनाशी आहे,
तेव्हा खुनाबद्दल आरोपीस का शिक्षा करता ? ' तर हे वकिलाचे म्हणणे कसे
दिसेल ?
बुद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानापुढे हा पुरावा टिकणे शक्य नव्हते. बुद्ध तत्त्वाने
सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करुन शूद्रांना उच्चपद प्राप्त करुन
दिले. त्याकाळी अनेक शूद्र राजे झाल्याचे दाखले आहेत. आपल्या हातातील