६-५-१९४५ आम्ही आमच्या कर्तृत्वाचे आणि हिमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू - Page 529

आम्ही आमच्या कर्तृत्वाने . . . . जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू ४८९

मुंबईत २६,००० सभासद

या अधिवेशनाची तयारी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ

नाही. प्रथम त्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई

पुरती दलित फेडरेशनची परिषद भरविण्याचे ठरविले होते पण

< डॉ. आंबेडकरांची भेट घेण्यासाठी फेडरेशनच्या मुंबई शाखेचे सेक्रेटरी

श्री. एस. बी. जाधव दिल्लीस गेले तेव्हा फक्त मुंबई शहराऐवजी अखिल भारतीय

[अधिवेशन ताबडतोब भरविण्याचा निर्णय त्यांना कळविण्यात आला. एवढ्या

थोड्या मुदतीत सर्व तयारी पार पाडण्याचे कार्य स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट

रीतीने बजावले. प्रथम त्यांनी मुंबई हा दलित फेडरेशनच्या संघटनेचा आदर्श

बनविण्यासाठी सभासद नोंदणीची मोहीम जोरात सुरू केली. मुंबईतील

फेडरेशनच्या २० वार्ड कमिट्यांनी धुमधडाक्याच्या प्रचाराने सभासदांची संख्या

॥६ हजारावरून २६ हजारावर नेली. "नरे पाक'वर शोभिवंत मंडप उभारण्याचे

|काम झटपट पार पाडण्यात आले. बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींना व प्रेक्षकांना

उतरण्यासाठी परळ भागातील म्युनिसिपल शाळात सोय करण्यात आली. नरे

क्षर्कवर अधिवेशनाच्या वेळी जमलेला प्रचंड जनसमुदाय मुंबईतील दलित

॥कडरेशानच्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जिवापाड मेहनत घेऊन

निर्माण केलेल्या प्रचंड उत्साहाचा पुरावा होता.

दहा हजारांची मिरवणूक

शुक्रवार, ता. ४ रोजी संध्याकाळी दादर स्टेशनवर अखिल भारतीय दलित

फेडरेशनचे अध्यक्ष रावबहादूर शिवराज यांचे थाटाने स्वागत करण्यात

आले. परळ महिला संघातर्फे सौ. मीनांबल शिवराज यांना हार घालण्यात

आला. तेथून नरे पार्कपर्यंत अध्यक्षांना मिरवणुकीने नेण्यात आले. मिरवणुकीत

१०,००० लोकांनी भाग घेतला होता. “आठ कोटी दलित जनतेचे सामर्थ्य

अजिंक्य आहे,” "डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिरायु होवोत,” "दलित | फेडरेशनच्या झेंड्याखाली एक व्हा,” "हरिजन या नावाचा धिक्कार असो,"

“समता सैनिक दलात सामील व्हा,” वगैरे ब्रीदवाक्ये लिहिलेल्या लाल पताका | मिरवणूकीत प्रामुख्याने दिसत होत्या. डॉ. आंबेडकरांच्या जयजयकाराने

| वातावरण दुमदुमून गेले होते.

पाऊण मैल लांब पसरलेली ही मिरवणूक नरे पार्क वरील “साध्वी रमाबाई | आंबेडकर नगर' मध्ये पोहचल्यानंतर तेथे वीस हजारांच्या समुदायासमोर रा. ब.

॥ शिवराज यांच्या हस्ते झेंडावंदनाचा गंभीर समारंभ झाला. जहाजाच्या नांगराचे