२४-१-१९३७ ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेद- वारांना निवडून देऊ नका - Page 53

ज्यांना पक्ष नाही.....उमेदवारांना निवडून देऊ नका १५

करमाळ्याची सभा

करमाळे येथील पुढारी श्री. खंडेराव कांबळे आणि त्यांच्या साह्यकारी बांधवांनी भव्य आणि शोभिवंत अशा उभारलेल्या मंडपात पाच हजार लोकांचा समुदाय आतुरतेने मार्गेप्रतीक्षा करीत बसला होता. बाबासाहेब येताच 'आंबेडकर झिंदाबाद, आंबेडकर की जय' वगैरे घोषणांनी आकाश दुमदुमले. प्रथम तेथील सुशिक्षित महार पुढारी श्री. जनार्दनराव कांबळे यांनी बाबासाहेबांचे गुणगौरवपर सुंदर आणि मुद्देसूद असे भाषण केले व बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे श्री. ऐदाळे यास मते देण्यास इकडील समाज आनंदाने तयार असल्याचे सांगितले. नंतर बाबासाहेबांनी सोलापूरप्रमाणेच अर्धा तासपर्यंत भाषण केले. नंतर नगरचे उमेदवार श्री. प्रभाकरराव रोहम यांनीही त्यास दुजोरा देणारे उत्तम भाषण केले. नंतर तेथील खिश्चन मिशनकडील उपदेशक यांनी श्री. ऐदाळे यास दुजोरा देणारे भाषण केले. स्थानिक पुढारी श्री. खंडेराव कांबळे यांनी बाबासाहेबांचे व सभाजनांचे आभार मानून ऐदाळे यास निवडून आणण्याबद्दल करमाळे तालुका अगोदरच तयार असल्याचे सांगितले. शेवटी हारतुरे होऊन बाबासाहेबांच्या जयजयकारात सभा बरखास्त [झाली ] व [श्री. ] रोहम आणि नगरकडील इतर पुढारी मंडळी यांच्यासमवेत बाबासाहेब कर्जतकडे रवाना झाले.

सोलापूर जिल्ह्यातील बाबासाहेब आंबेडकर यांचा दौरा सर्वपरी यशस्वी होण्याच्या कामी ज्या कित्येक सद्गृहस्थांनी मदत केली [त्यात ] [सोलापूरचे ] अस्पृश्यांचे हितचिंतक रा. ब. डॉ. मुळे यांची मदत फारच झालेली आहे. तसेच कुर्डुवाडीचे त्यांचे मित्र श्री. हिरालाल शेठ परदेशी व [बार्शी ] [येथील ] [स्पृश्य ] मंडळी यांचीही मदत झालेली आहे. जिल्ह्यातील [सर्व ] [ठिकाणच्या ] [महार ] बांधवांनी झटून मदत केली. तसेच सोलापूरचे [तरुण ] [मातंग ] [पुढारी ] [केरू ] रामचंद्र जाधव, अंबाजी पिलाजी जाधव, परशुराम केशव [लोंढे, ] [शंकर ] [मऱ्याप्पा ] जाधव, वमाजी धोंडी चव्हाण, भागणा परशुराम [हेगडे, ] [अप्पाजी ] [सुभाना ] वाघमारे, टेंभुर्णीचे जगताप ब्रदर्स आणि [बार्शीचे ] [मनोहर ] [गोमाजी ] [कांबळे ] [व ] प्रेमाजी आपा कांबळे या मातंग बांधवांनीही अतिशय [मेहनत ] [घेतली ] [आहे. ] [बार्शी ] भागातील मत प्रचार, मिरवणुकीची आणि मंडपातील सर्व प्रकारची [व्यवस्था ] बार्शीकर कांबळे ब्रदर्स या मातंग बांधवांच्या सहाय्यामुळेच उत्तम अशी [झाली ]

हे त्यास भूषणावह आहे.

+ + +