२५-१-१९३७ खोटे दस्तऐवज करणारे गरीब शेतकरी, कामकरी लोकांचे कल्याण करतील काय ? - Page 54

९९
खोटे दस्तऐवज करणारे गरीब, शेतकरी,
कामकरी लोकांचे कल्याण करतील काय ?

अहमदनगर येथे तारीख २५ जानेवारी १९३७ रोजी आगाऊ जाहीर केल्याप्रमाणे कॅम्प सदर येथे शनीच्या देवळामागील भव्य मंडपात अस्पृश्य समाजाची अहमदनगर जिल्हा परिषद, अखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे एकमेव पुढारी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती. या परिषदेला लोकसमुदाय सरासरी ५-६ हजारांवर जमला होता. जिकडे-तिकडे लोकात उत्साह व आनंद दिसत होता. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाची लोक आतुरतेने वाट पहात होते. काही अस्पृश्य व अधिकारीवर्गही हजर होता. मंडपामध्ये पुण्याचे अर्जुनराव नलावडे, पारगावकर भानुदास, नेवासकर कवराम व पंढरीनाथबुवा हे सामाजिक पदे वीरश्रीयुक्त म्हणून लोकांची करमणूक करीत होते. तसेच म्हपाजी भिमाजी चाबुकस्वार, झखणगावकर कवी यांनी बाबासाहेबांचे गुणवर्णनपर वीरश्रीयुक्त, लोकांत शौर्य उत्पन्न होईल असे पोवाडे गाईले. बाबासाहेबांची येण्याची वेळ ८ वाजण्याची होती, परंतु दुपारचे बारा वाजून गेले तरी बाबासाहेब येईनात म्हणून काही स्पृश्य वर्गात निराशा भासू लागली. तरीपण अस्पृश्य वर्गात सारखा उत्साह व आनंद दिसत होता. वरच्यावर लोकांचे थवेच्या थवे जमून बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता लोक सारखे तिष्ठत बसले होते. बाबासाहेबांच्या येण्याच्या वाटेवर त्यांचे स्वागत करण्याकरिता फर्स्ट लॉयन स्काऊट बॅन्ड व स्काऊट, राधीचा मळा येथील बलभीम स्काऊट, मातंग _. प्रभृति मंडळ स्काऊट, माळीवाडा, दरेवाडी येथील स्काऊट, पेवशव लाइन कॅम्प येथील मातंग स्काऊट, बाकोडी येथील स्काऊट मिळून तिनशे स्काऊट लाठी व बँडसह हजर होते. तसेच राहरीकर महार मंडळीच्या बँड, शिंग, तुताऱ्या वाद्यांच्या आवाजाने सर्व वातावरण दुमदुमून गेले होते. जिकडे तिकडे वीरश्री उत्पन्न होऊन बाबासाहेबांच्या नावाचा सारखा जयजयकार होत होता. बरोबर दुपारी २ वाजता बाबासाहेबांची मोटार येताच वाद्यांचा घनघनाट व डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणांचा सारखा गजर होत होता. बाबासाहेबांबरोबर मोटारीत श्री. प्रभाकर रोहमसाहेब, बी. एस. कदम, कर्जत; एस. आर. साळवे, नगर; विठ्ठलराव गायकवाड, नगरकर ही प्रमुख मंडळी होती. बाबासाहेबांना सर्व स्काऊटने बॅडसह सलामी दिली, त्यावेळचा देखावा

[°° जनता :१३फेब्रुवारी १९३७