आम्ही आमच्या कर्तृत्वाने . . . . जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू ४९१
फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. पी. एन. राजभोज यांनी गेल्या वर्षीच्या
' कामाचा अहवाल परिषदेला सादर केला.” १
“' स्वागत समितीचे ज. से. श्री. एस. बी. जाधव यांनी अधिवेशनासाठी [आलेले ]
' शुभसंदेश वाचले. त्यात रिझर्व बँकेचे गव्हर्नर सी. डी. देशमुख ।. 0. 5.,
' मुंबईचे मेअर डॉ. आल्बन डिसोझा, सिटी इंजिनियर [मोडक, ] [नॅशनल ] [वॉरफ्रंटचे ]
सर रुस्तम मसाणी, मुंबई गव्हर्नरचे सल्लागार मि. मदन 1.0.5. व
टाँटन् ।. 0. §., सर कावसजी जहांगीर, मुंबई [प्रांताचे ] [माजी ] [मुख्य ] [प्रधान ] ` बाळासाहेब खेर, आसामचे माजी [मंत्री ] [श्री. ] [सेखिया, ] [मद्रास ] [जस्टिस ] [पार्टीचे ] के. ए. पी. विशवनाथन्, कानपूरचे [प्राणदत्त, ] [मुंबईचे ] [श्री. ] [वेलणकर, ] [बॅरिस्टर ] [माने, ] बडोद्याचे मणिलाल परमार [वगैरे ] [प्रभूतींचे ] [संदेश ] [होते. ] तद्नंतर स्वागताध्यक्ष
श्री. जी. एम्. जाधव उर्फ मडकेबुवा [हे ] [भाषण ] [करावयास ] [उठले. ] पेंन्डालमध्ये
जमलेला अफाट जनसमुदाय [पाहून ] [त्यांना ] [गहिवरून ] [आले. ] प्रस्तावनेदाखल
थोडेसे बोलून त्यांचे भाषण [वाचून ] [दाखविण्यास ] [आमदार ] [पी. ] [जे. ] [रोहम ] [यांना ]
त्यांनी विनंती केली. त्यांच्या भाषणानंतर अधिवेशनाच्या [अध्यक्षांना ] [त्यांनी ]
पुष्पहार आणि गुच्छ अर्पण [केल्यावर ] [रा. ] [ब. ] [एन. ] [शिवराज ] [हे ] [बोलावयास ]
उठले. प्रेक्षकातून सारखा टाळ्यांचा [निनाद ] [ऐकू ] [येत ] [होता. ] ओं. इं. शे. का.
फेडरेशनचे तिसऱ्यांदा [अध्यक्ष ] [निवडल्याबद्दल ] [त्यांनी ] [धन्यता ] [व्यक्त ] [केली ] [आणि ]
आपले अध्यक्षीय भाषण [अध्यक्षांनी ] [इंग्रजीतून ] [केलेले ] [सर्व ] [लोकांना ] [कळावे ] [म्हणून ]
आमदार भा. कृ. गायकवाड [यांनी ] [त्यांचे ] [विचारपरिप्लुत ] [भाषण ] [सुंदर ] [मराठीतून ]
लोकांपुढे ठेवले. या अधिवेशनाला सुरवातीपासून [डॉ. ] [बाबासाहेब ] [आंबेडकर ]
हजर होते.” [२ ]
'' परिषेदेचे ठराव
डॉ. आंबेडकरांच्या भाषणानंतर परिषदेपुढील चार महत्त्वाच्या ठरावांवर
निरनिराळया वक्त्यांची भाषणे झाली.
पहिल्या ठरावात सप्रू योजनेला विरोध करण्यात आला आहे व
घटनासमितीची कल्पना दलित फेडरेशनला नापसंत असल्याचे जाहीर करण्यात
आले आहे.
--दुसऱ्या ठरावात फेडरेशनच्या वर्किंग कमिटीने सप्टेंबर १९४४ मध्ये मद्रास
येशील बैठकीत मांडलेल्या राजकीय मागण्यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
' लोकयुद्ध : १३ मे १९४५.
२ जनता : १२ में १९४५.