६-५-१९४५ आम्ही आमच्या कर्तृत्वाचे आणि हिमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू - Page 532

४९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

--बंगालचे श्री. मनोहर धाली यांनी मांडलेल्या तिसऱ्या ठरावात

सरकारच्या औद्योगिक धोरणाविषयी तीव्र नापसंती दर्शविण्यात आली

उद्योगधंदे व जमीन सरकारी मालकीच्या झाल्या पाहिजेत अशी मागणी

आली आहे. याच ठरावात बंगालमधील दुष्काळाने उडालेल्या हाहा:

दुःख व्यक्त करण्यात आले आहे व त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी उपाय

योजण्यास सरकारला बजावले आहे.

-~चौथ्या ठरावात युद्धानंतर बेकार होणाऱ्या अस्पृश्य सैनिकांसाठी योग्य

तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

महिला परिषद

याच प्रसंगी सौ. मिनांबल शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य महिला परिषद भरविण्यात आली होती. परिषदेपुढील मुख्य ठराव शिक्षणासंबंधी होता. कु. शांताबाई दाणी, डॉक्टर कु. लोंढे, सौ. विमलाबाई भोसले, ं सौ. गीताबाई गायकवाड, सौ. सर्वगोढ, सौ. शांताबाई वडळकर वगैरे वक्त्यांनी जोरदार भाषणे करून अस्पृश्य महिलांना फेडरेशनची संघटना बळकट करण्याचा संदेश दिला.

ह. ३

म्युनिसीपल कामगारांच्या मागण्या

शनिवारी रात्री भरलेल्या मुंबई म्युनिसीपल कामगार संघाच्या परिषदेत अशी मागणी करण्यात आली की, म्युनिसीपल कामगारांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी हिंदुस्थान सरकारने एक कमिटी नेमावी. तसेच पुरेशा महागाई भत्त्याचीही मागणी करण्यात आली. अस्पृश्य समाजापैकी बराच मोठा भाग म्युनिसीपल कामगारांचा असल्यामुळे ह्या परिषदेचे विशेष महत्त्व होते.

विद्यार्थी परिषद

रविवारी सकाळी श्री. प्यारेलाल तलीब यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या विद्यार्थी परिषदेत अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र शाळा व कॉलेजे उघडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

समता सैनिक दल

दुपारी श्री. जे. एच. सुबय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समता सैनिक दलाच्या परिषदेत अस्पृश्य तरुणांना या संघटनेमध्ये हजारोंच्या संख्येत सामील होण्याचा संदेश देण्यात आला. त्यांच्याच अध्यक्षतेखाली संस्थानातील दलित फेडरेशनचे अखिल भारतीय अधिवेशन झाले.