| |
आम्ही आमच्या कर्तृत्वाने . . . . जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू ४९५
डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,
हा जो अफाट जनसमुदाय जमलेला आहे तो पाहून कोणाही सार्वजनिक काम
करणाऱ्या माणसाला अचंबा वाटल्याशिवाय राहणार नाही. सार्वजनिक कार्यात ` कार्यकर्त्यास विशेष विद्या किंवा बुद्धी लागते असे नाही. जर कार्याची खरीखुरी _ तळमळ असेल, त्याग करण्याची प्रवृत्ती असेल तर कोणीही चांगले कार्य करून
दाखवू शकेल. असे लोक आपल्यात आहेत व आणखीही निर्माण होतील, अशी मुला आशा आहे. आपले कार्य अतिशय बिकट आहे. काँग्रेस, मुस्लिम लीग
किंवा हिंदू महासभा यांच्यासारखा आपल्याजवळ पैसा नाही त्यामुळे पगारी लोक नेमून जागृतीचे कार्य करू शकत नाही. आपले काही लोक अती अज्ञानी व
भोळसर असल्यामुळे काँग्रेसच्या किंवा हिंदू महासभेच्या लोकांनी काही आमिष
दाखविले तर असे लोक त्यांना वश होतात. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे अगर
हिंदू महासभेचे प्रचारक बनून आपल्या चळवळीत फूट पाडण्याचा प्रयत्न
करतात. आपल्या चळवळीच्या प्रचाराकरिता आपल्या हाती वर्तमानपत्रे
नाहीत. काँग्रेसची वर्तमानपत्रे आपल्या बातम्याच देत नाहीत, बातमी दिलीच
तर ती विकृत स्वरूपाची देतात. या समुदायाकडे पाहिले तर कोणलाही म्हणावे
लागेल की येथे सव्वा, दिड लाख लोक हजर आहेत. पण एका मराठी
वर्तमानपत्राने काल फक्त सहाशे लोक हजर होते असे लिहिले आहे !!
लॉर्ड वेव्हेलसाहेब विलायतेला गेले आहेत. ते काहे कुणालाही ठाऊक
नाही परंतु ज्या बातम्या पसरल्या आहेत त्यावरून असे दिसते की हिंदुस्थानच्या
नवीन बंधारणाची वाटाघाट करण्यासाठी लॉर्ड वेव्हेलसाहेब गेले आहेत. भुलाभाई
देसाई व काँग्रेसची पत्रे यांनीच या बातम्या उठविल्या असल्याने त्यात काही
सत्यांश असावा असे वाटते. त्या बाबतीत दोन शब्द सांगावयाचे.मी ठरविले
आहे. माझे भाषण इंग्रजीत लिहिले आहे. मातृभाषेऐवजी इंग्रजीत भाषण
लिहून आणण्याचा खेद वाटतो. परंतु इंग्रजी ही राजकीय भाषा असल्यामुळे
सरकारला व इतर सर्व प्रकारच्या लोकांना कळविण्याकरिता भाषण इंग्रजीतच
लिहावे लागले. तुमच्या सर्वाच्या माहितीकरिता माझ्या या इंग्रजी भाषणाचे
मराठीत भाषांतर आपल्या ' जनता ' पत्रकातून येईल.
आज बरेच लोक अस्पृश्य वर्गाकडे टक लावून पाहत आहेत. एकेकाळी
अस्पृश्यांना कोणी विचारीत नव्हते. १९२८ साली सायमन कमिशन नेमले
गेले. त्यावेळी लॉर्ड बर्कन हेड हिन्दी लोकांना म्हणाले की तुम्ही काही राजकीय
घटनेची निर्मिती करून दाखवा ! या लॉर्ड बर्कन हेडच्या म्हणण्यावरून
काँग्रेसने १९२८ साली ' नेहरू कमिटी ' नेमली व या नेहरू कमिटीने हिन्दी