|
४९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पण आता मुसलमानांशी भांड करावा लागणार आहे. सप्रू समितीच्या निर्णयावरुन मुसलमानांकडून पत्रातून अस्पृश्यांवर टीका होऊ लागली आहे. मुसलमान म्हणतात की अस्पृश्य हिंदूच आहेत. हिंदुंच्या जागा कमी करून अस्पृश्यांना दिल्या तर त्यात आमचा काय फायदा ? मला मुसलमानांच्या या विचारसरणीबद्दल खेद वाटतो. मला त्यांच्याशी भांडावयाचे नाही. मुसलमानांनी १९०७ साली माँटेग्यूना जे मानपत्र दिले त्यात त्यांनीच अस्पृश्यांना हिन्दुपासून अलग करण्याची प्रथम मागणी केली. तेव्हापासून अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघ वगैरे मागण्यांना मुसलमान पाठिंबा देऊ लागले पण तेच आज उठलेले आहेत. अशी स्थिती असल्यामुळे आपण फार जोराने लढा दिला पाहिजे. आपण जिंकलो आहो, अशी कोणीही कल्पना. करू नये. शेवटी चळवळीच्या मजबुतीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठांचे हुकूम बिनतक्रार मानले पाहिजेत.'* १
“ आपण इतर कोणत्याही पक्षाच्या सहानुभूतीवर अवलंबून न राहाता आपली स्वतंत्र संघटना जोरदार उभी करावयास पाहिजे.
श्री. मडकेबुवांचा गौरवपूर्ण उल्लेख करून ते म्हणाले, “ आपणापैकी कोणालाही मग तो कितीही अशिक्षित असो, आपल्या समाजाची सेवा करण्याचा पूर्ण अधिकार आहे व असे कार्य करणारे नेते आपल्यातून उत्पन्न होतील अशी माझी खात्री आहे.
आपण सर्वांनी जो एवढा उत्साह व कार्यक्षमता दाखविली त्याबद्दल मी धन्यवाद देऊन माझे भाषण संपवितो. (प्रचंड टाळ्या). “२
DR MOP ७? र,
१ जनता : १२ मे १९४५.
२ लोकयुद्ध : १३ मे १९४५.