६-५-१९४५ आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको - Page 539

२१९
आम्हाला राजकीय बहुमत हवे;
जातीय बहुमत नको

मुंबई येथे दिनांक ६ मे १९४५ रोजी भरणाऱ्या अखिल भारतीय शेड्यूल्ड ` कास्ट्स्‌ फेडरेशनच्या अधिवेशनाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'खास' भाषण इंग्रजीत तयार केले होते आणि त्याचे मराठी भाषांतर 'जनता' पत्रातून

` वाचावयास मिळेल असे त्यांनी अधिवेशनात जाहीर केले होते. त्या इंग्रजी भाषणाचे मराठी भाषांतर खालीलप्रमाणे 'जनता' पत्रातून प्रसिद्ध झाले होते.

--संपादक

' ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या या अधिवेशनास आपण मला :

फेडरेशनची झालेली प्रचंड वाढ पाहून कोणालाही अचंबा वाटल्याशिवाय राहाणार नाही. अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन हीच आपली एकमेव प्रातिनिधिक संस्था बनविण्याच्या हेतूने प्रेरित होऊन हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्य समाज फेडरेशनच्या झेंड्याखाली एकत्रित झाला आहे. | |

अस्पृश्यांच्या उन्नतीच्या मार्गाला प्रतिरोध करणाऱ्या पुष्कळ अडचणी आहेत

हे, जे प्रामाणिकपणे जाणतील त्यांनाच इतक्या अल्पावधीत फेडरेशनच्या झालेल्या

प्रचंड वाढीचे रहस्य समजू शकेल. इतर राजकीय पक्षांच्या लोकांकडून

आमच्या लोकांना खोटी आमिषे दाखवून फसविण्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न केला

जातो. आपल्या लोकात इतके अज्ञान भरले आहे की, त्यांना आपण किती

आणीबाणीच्या प्रसंगात आहो हे समजू शकत नाही. त्याचप्रमाणे आपले

राजकीय उद्दिष्ट साधण्यासाठी संघटनेचे किती महत्त्व आहे हेही कळू शकत

नाही. आपल्या चळवळींची साधने इतकी तुटपुंजी आहेत की त्या बाबतीत

आपली स्थिती फारच केविलवाणी आहे. चळवळीकरिता आपल्याजवळ पैसा

नाही, आपल्याजवळ वर्तमानपत्रे नाहीत. आपल्या लोकांवर सबंध हिंदुस्थानभर

जे सतत अमानुष अत्याचार केले जातात, जी दडपशाही केली जाते, तिला इतर

वर्तमानपत्रातून मुळीच प्रसिद्धी दिली जात नाही, इतकेच नव्हे तर ही वर्तमानपत्रे

आमची सामाजिक व राजकीय मते पद्धतशीरपणे दडपण्यासाठी व्यवस्थित कट

करतात. आपल्या लोकात जागृती करण्यासाठी आणि आवश्यक ती मदत

करण्यासाठी जी साधनसामग्री पाहिजे त्याकरिता आपल्याजवळ पैसा नाही.