खोटे दस्तऐवज करणारे . . . . . कल्याण करतील काय ? १७
अत्यंत शौर्याचा व वीरश्रीचा दिसत होता. बाबासाहेबांची मोटार मध्ये घेऊन
आजुबाजूस सर्व लाठीबंद स्काउट रांगेने चालत असून मध्ये बँड, शिंग, तुतास्या अशा वाद्यांच्या गजरात अफाट जनसमुदायासह मोठ्या थाटाने ही जंगी मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी स्त्रियांचा जमाव जमलेला असून बाबासाहेबांना हार अर्पण करीत व फुले उधळत होता. मिरवणुकीनंतर बाबासाहेब सभेत स्टेजवर स्थानापन्न झाले व सभेस रीतसर सुरवात झाली. परिषदेचे सेक्रेटरी रंगनाथ मारुतीराव सूर्यवंशी यांनी जमलेल्या लोकांचे अभिनंदन करून डॉ. बाबासाहेबांनी नगर जिल्ह्याला भेट दिली याबद्दल आम्ही बाबासाहेबांचे अत्यंत ऋणी आहोत असे सांगून आभार मानले. तसेच स्वागताध्यक्ष सखाराम बाळाजी भिंगारदिवे यांनी बाबासाहेबांचे स्वागतपर भाषण करून जमलेल्या लोकांना. बाबासाहेबांची ओळख करून दिली. मे. रामचंद्र मकाजी नलवडे (ढोर) व
श्री. सोनवणे (ढोर), नगर येथील मातंग समाजाचे पुढारी शंकरराव साठे (माळीवाडा), महार समाजातील श्री. भाऊराव यशवंत कदम, मारुतीराव गायकवाड देहरेकर, यशवंत श्रावण पाटोळे, वगैरे मंडळीनी नगर जिल्ह्यात
श्री. प्रभाकर जनार्दन रोहम यांनाच निवडून देणे किती जरूरीचे आहे असे भाषण करून प्रचंड मताने त्यास आम्ही निवडून देऊ असे बाबासाहेबांना आश्वासन दिले. नंतर स्काउट मास्तर शंकरनाथ कुशाबा कांबळे यांनी बाबासाहेबांची कर्तबगारी, चांभार समाजाचे समाजद्रोही व घातक वर्तन, काँग्रेसचे कृतघ्न धोरण यावर परिणामकारक भाषण करून श्री. प्रभाकर जनार्दन रोहम यांनाच आपल्या नगर जिल्ह्यातर्फे निवडून देण्याबद्दल लोकांना विनंती केली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करण्यास उठताच सर्वत्र बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा व टाळ्या एकसारख्या होत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
बंधु-भगिनींनो,
आजच्या सभेतील लोकांचा हा अलोट समुदाय आणि एकंदरीत नगर जिल्ह्यातील सर्व लोकांचा उत्साह पाहून मला आनंद वाटतो. आजची ही परिषद रा. रोहम यांचे निवडणुकीचे बाबतीत भरली आहे हे आपणास माहीत आहे. तरीपण ज्याअर्थी मी माझ्या पार्टीतून जे जे उमेदवार उभे केले आहेत त्याअर्थी त्या त्या उमेदवाराला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे.
रा. रोहम यांना ह्या नगर जिल्ह्यात महार-मांग लोकांचा विरोध नाही ही आनंदाची गोष्ट होय. फक्त चांभार विरोध आहे ; पण त्याची तुम्ही पर्वा करू नका. त्यांच्या उमेदवारांना मुळीच मते देऊ नका हे मी उघड सांगतो. अस्पृश्य वर्गासाठी मिळविलेले हक्क सर्व अस्पृश्य लोकात विभागले जावेत ही गोष्ट खरी.