आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको ५०३
आणि तिला एखाद्या घटकाने मान्यता दिली नाही व दुसऱ्या एखाद्या घटकाने विरोध दर्शविला तर या देशात या घटनेशी शत्रुत्वाचे नाते असलेला एक घटक तयार होईल आणि तो त्या घटनेच्या कामकाजात अडथळा उत्पन्न करूनच थांबणार नाही तर आपली सर्व शक्ती एकवटून ती, ती घटना नेस्तनाबूद करण्यासाठी खर्ची घालील. घटनाविरोधी घटक आपले कर्तव्य म्हणून ती घटना नाश करण्याचा आटोकाट प्रयत्न करील आणि घटना राबवीत असणाऱ्या घटकांविरूद्ध लॅटिन अमेरिकेच्या धर्तीवर स्पष्टपणे जाहीर प्रचार करील.
ब्रिटिशांनी हिंदी घटना तयार करणे अगदी निरुपयोगी आहे कारण ती
अंमलात आणण्यासाठी ते येथे राहाणार नाहीत. कोणत्याही शक्तिमान घटकाने
अगर अशा अनेक घटकांच्या समुदायाने ती घटना इतर घटकांवर जर लादण्याचा
प्रयत्न केला, तर तोच अनुभव चाखावयास मिळेल. म्हणून माझे असे ठाम मत
झाले आहे की, जर हिंदी लोकांना स्वायत्तता पाहिजे असेल तर घटना तयार
करण्याच्या जबाबदारीतून ते केव्हाही निसटू शकणार नाहीत. अशाप्रकारे
न टाळता येण्यासारखी ती परिस्थिती आहे.
घटना
दुसरा प्रश्न जो उपस्थित करणार आहे तो हा की, घटना निर्माण करण्यासाठी
घटना समितीची आवश्यकता आहे का? प्रत्येक माणसाच्या तोंडी घटना
समिती झाली आहे. ' जीमध्ये सर्वस्वी हिंदी लोकांचा भरणा असेल अशा घटना
समितीने घटना तयार करावी ' अशा प्रकारची मागणी कॉग्रेस मंत्रीमंडळांनी
राजीनामे देण्यापूर्वी, काँग्रेस पक्षाने आपल्या ठरावाच्याद्वारे केली
होती. क्रिप्स योजनेमध्ये सुद्धा घटना समितीचा अंतर्भाव करण्यात आला
होता. सप्रू कमिटीने त्याचीच ' री ' ओढली आहे.
मला स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, मी या घटना समितीच्या अगदी पूर्णपणे
विरूद्ध आहे. तिची काही एक आवश्यकता नाही. मला वाटते की, जिच्यामुळे
या देशात आपापसात बंडाळी माजेल अशी ती एक भयंकर योजना आहे. प्रथमत:
मला समजत नाही की, घटना समितीची एवढी आपणास काय आवश्यकता
आहे ? ज्यावेळी युनायटेड स्टेद्सूची राज्यघटना तयार करण्यात आली
त्यावेळी अमेरिकन घटनेचे निर्माते ज्या परिस्थितीत होते त्या परिस्थितीत हिंदी
लोक नाहीत. स्वातंत्र्याचा उपभोग घेतलेल्या जनतेसाठी योग्य अशा कल्पना
त्यांना पुढे मांडाव्या लागल्या. घटना तयार करण्यासाठी त्यांच्यापुढे एखादा
उत्कृष्ट नमूना नव्हता. पण हिंदुस्थानची परिस्थिती याहून अगदी भिन्न