५०६ डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहे. खालील तक्त्यावरून या दोन योजनेतील प्रतिनिधीत्वाच्या विभागणीतील
फरक सहज ध्यानी येईल.
नदाल ननक समितीतील जागेची विभागणी टट जमाती आणि हितसंबंध || योजनेप्रमाणे सप्रू योजनेप्रमाणे
(३) eee | eo PP
हिंदू
मुसलमान
अस्पृश्य समाज
शीख
इंडियन खिश्चन
अँग्लो इंडियन
युरोपियन
आदिवासीय जमाती
विशिष्ट हितसंबंध
en
घटना समितीच्या रचनेत सप्रू कमिटीने प्रत्येक जमातीसाठी निश्चित केवळ नुसते आकडे ठरवून टाकलेले नाहीत तर तिने हिंदू-मुसलमानांना समपातळीत आणिले आहे. हा जो फरक आहे त्याबद्दल घटना समितीने अशी एक सबब पुढे केली आहे की, ज्याअर्थी मुसलमानांना एवढी देणगी देण्यात आली आहे त्याअर्थी घटना समितीच्या निवडणुका संयुक्त मतदान पद्धतीवर झाल्या पाहिजेत. या बाबतीत सप्रू कमिटीला क्रीप्स योजना समजली नाही, हे म्हणणे अगदी रास्त आहे. क्रिप्स योजनेमध्ये संयुक्त मतदान पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यातील एक पोट-कलम असे आहे "प्रांतिक कायदे मंडळांपैकी कनिष्ठ मंडळांच्या (Lower ५०५७९७) सभासदासाठी मतदारांचे फक्त एकच दालन असावे.' हेच दुसऱ्या प्रकाराने असे म्हणता येईल की, संयुक्त मतदान पद्धतीने निवडणूक व्हावी अशा रितीने सप्रू कमिटीने एका घटकाला विनाकारण काही तरी दिले आहे व इतर जमातींना संकटात नेऊन सोडले आहे.
क्रिप्स योजनेमध्ये जे सभासद हजर आहेत व ज्यांनी मतदान केले आहे, अशांच्या बहुमतावर घटना समितीचा निकाल अवलंबून राहाणार आहे, परंतु सप्रू योजनेमध्ये जे सभासद हजर आहेत व ज्यांनी मतदान केले आहे अशांच्या तीन चतुर्थांश मतांवर घटना समितीचा निकाल अवलंबून राहाणार आहे.