६-५-१९४५ आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको - Page 552

५१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

यास्तव अशा बहुसंख्य जमातींची छाटाछाट करून तिला तिच्या बरोबरीने

आणण्याची मागणी केली अशा शाश्‍वत सांत्वनप्रिय धोरणापेक्षा दूसरे कोणतेही

वेडगळ धोरण नाही. ज्याला अंत नाही असे सांत्वनप्रिय व अमर्याद मागण्यांचे

धोरण आहे.

स्पष्टच बोलावयाचे झाले तर जी जमात हा डावपेच खेळते तिला बिलकूल

दोषी ठरविता येत नाही, तिचा फायदा होतो म्हणूनच ती यामध्ये भाग घेते, मर्यादा

घालण्यास काही तत्त्वे नाहीत म्हणूनच ती हा डावपेच खेळते आणि तिची अशी

खात्री असते की आणखीही आपण फायदेशीर काही मागितले तर ते

मिळेल. उलटपक्षी अशी एक जमात आहे की, आर्थिकदृष्ट्या तिची अत्यंत

हलाखीची परिस्थिती आहे. सामाजिकदृष्ट्या ती अगदी हीन दर्जास पोहोचली

आहे. शैक्षणिकदृष्ट्या फारच मागासलेली आहे व इतरांकडून निर्लज्जपणे होणारे जुलूम जिला निमूटपणे सहन करावे लागतात आणि ज्याबद्दल त्यांना कधीही पश्चाताप झालेला नाही, जिच्यावर समाजाने बहिष्कार घातला आहे, जिची सरकारने अवहेलना केली आहे, जिच्यासाठी संरक्षणाची लिहिलेली तरतूद केलेली नाही, न्यायदान, न्याय्य वागणूक व समान संधीविषयी जी नेहमी उदास असते अशा जमातीला संरक्षण देणाच्या बाबतीत अगदी नकार दर्शविण्यात आला आहे. याचे कारण तिला संरक्षणाची आवश्यकता नाही हे नसून ज्या गुंडाला हक्काचा मक्ता दिला आहे, तोच यात लक्ष घालीत नाही. याचे कारण असे दर्शविण्यात येते की, ही जमात राजकीयदृष्ट्या चांगली सुसंघटित झालेली नाही म्हणूनच तिच्या मागण्यांना मान्यता मिळत नाही आणि हा त्याचा थापेबाजीचा उपक्रम अगदी यशस्वी रितीने पार पडत आहे.

'एकास हात व दुसऱ्यास लाथ' हे जे वर्तन आज पाहावयास मिळत आहे, त्याचे कारण हे आहे की, ज्या जमातींचा जातीय प्रश्‍नात समावेश होत आहे, त्यांना बंधनकारक किंवा अधिकारयुक्त अशा कोणत्याच तत्त्वाचा या बाबतीत अवलंब करण्यात आलेला नाही. या कमतरतेमुळे अगदी घातूक परिणाम झालेला आहे. यामुळे समाजाला आपले मत स्पष्टपणे पुढे मांडणे अगदी अशक्यप्राय झालेले आहे. कोणत्या धोरणाचा अंगिकार केला आहे हे तो जाणू शकतो, शिवाय एक धोरण चुकीचे ठरून दुसरे सुचविले जात आहे याची देखील तो खुणगाठ बांधू शकतो. एक धोरण चुकीचे का ठरले ? व दुसरे धोरण तरी यशस्वी होईल का ? या प्रश्‍नांची उत्तरे समाज बिलकूल देऊ शकणार नाही कारण हे इंद्रजाल त्याला अगदी अगम्य आहे म्हणून याचा परिणाम असा झाला आहे की, हेकेखोरपणाने आणि दांडगाईने वागणाऱ्या पक्षांवर त्याचे कार्य किती सकारण आहे आणि त्यात किती अर्थ आहे या बाबतीत हात घालण्यासंबंधी दडपण न टाकता समाज बध्यासारखा निव्वळ चित्रपटासारखे चाललेले जातीय प्रश्‍नासंबंधीचे वादविवाद तटस्थपणे पाहात उभा राहिला आहे.