५२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
याबाबतीत तशीच सबळ कारणे आहेत. राजकीय संधीचा योग्य तो फायदा घेण्याची कुवत अद्याप या आदिवासीय जमातीत आलेली नाही आणि त्यामुळे या जमाती बहुसंख्य किंवा अल्पसंख्य जमातींच्या हातातील अगदी सहज बाहुले बनतील, याचा परिणाम असा होईल की, यामुळे त्यांचा स्वतःचा फायदा काही एक न होता राजकारणातील समतोलपणा मात्र हवा तसा त्या ढासळू शकतील. त्यांच्या एकंदर वर्तमान परिस्थितीविषयी विचार करिता मला असे वाटते की, या मागासलेल्या जमातींविषयी जर कोणती योग्य गोष्ट करण्यासारखी असेल तर, ती ही की, दक्षिण आफ्रिकेची घटना ज्या तत्त्वावर आधारभूत झाली आहे त्या तत्त्वानुसार कायद्याच्याद्वारे एक मंडळ नेमण्यात यावे, त्याने आता
ज्याला ' बहिष्कृत विभाग ' (६५०।५५९०१ 837885) म्हणून संबोधण्यात येत आहे,
त्याचा योग्य तो कारभार पाहावा. ज्या ज्या प्रांतात हा बहिष्कृत विभाग विखुरलेला नसेल, त्या त्या प्रांताने या बहिष्कृत विभागाचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी प्रतिवर्षी काही तरी एक ठराविक रक्कम द्यावी.
(३) हिंदी संस्थाने
हिंदी संस्थानांचा माझ्या योजनेमध्ये मी अंतर्भाव केला नाही हे आपल्या निदर्शनास आलेच असेल. या संस्थानांचा अंतर्भाव करण्याच्या बाबतीत माझी काही एक आडकाठी नाही परंतु त्यांनी पुढील अटी मान्य केल्या पाहिजेत.--
(अ) ब्रिटिश हिंदुस्थान व हिंदी संस्थाने यामध्ये अखिल भारतीय राजकीय
सत्ता दुभागली जाता कामा नये.
(ब) कायद्यानुसार व राजकीय दृष्ट्या बंधनामुळे ब्रिटिश हिंदुस्थान व हिंदी
संस्थाने एकमेकांपासून विलग झाली आहेत त्यांचे उच्चाटन केले
पाहिजे. त्याचप्रमाणे ब्रिटिश हिंदुस्थान व हिंदी संस्थाने हे स्वतंत्र घटक
असता कामा नये इतकेच नव्हे तर, या दोन घटकांचा हिंदुस्थान या नावाने
एकच घटक निर्माण केला पाहिजे.
(क) ज्या अटींमुळे हिंदी संस्थानांचा अंतर्भाव करण्यात येत आहे त्यांची
हिंदी संपूर्ण स्वातंत्र्याला काही एक बाधा होत नाही. ब्रिटिश हिदुस्थान व
हिंदी संस्थाने यांच्या ऐक्याच्या दृष्टीने मी एक योजना आखली आहे. ती
या ठिकाणी इत्थंभूत सांगून माझे भाषण मी अवजड करू इच्छीत नाही. तूर्त
तरी ब्रिटिश हिंदुस्थानने हिंदी संस्थानांचा विचार न करिता आपले ध्येय
गाठण्याचा प्रयत्न करावा, नाही तर हिंदुस्थानच्या प्रगतीचा मार्ग मात्र
गुंतागुंतीत गुरफटल्याशिवाय राहाणार नाही.