आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको ५२५
ही योजना व पाकिस्तान
हिंदी ऐक्याच्या दृष्टीने ही योजना मी आखली आहे. मला उमेद आहे की, मुसलमान लोक तिचा स्वीकार करतील कारण यामध्ये त्यांना पाकिस्तान पेक्षाही जादा संरक्षण देण्यात आले आहे. पाकिस्तानला माझा काही एक विरोध नाही. माझी अशी खात्री आहे की, स्वयंनिर्णयाच्या तत्त्वावर पाकिस्तानची उभारणी करण्यात आली आहे आणि याबाबतीत आता शंकाकुशंका व्यक्त करणे अगदी अयोग्य आहे. या तत्त्वाचा मुसलमानांना जितका फायदा घेण्यासारखा असेल तितका त्यांनी घ्यावा. त्याबद्दल माझा काहीही विरोध नाही. पण त्याच्याबरोबर त्यांनी हेही लक्षात ठेविले पाहिजे की, मुसलमानेतर जे विभाग आहेत त्यामध्ये जर तेथील लोक या तत्त्वाचा फायदा घेत असतील तर त्यांना त्यांनी विरोध करता कामा नये. दुसऱ्या एका उत्कृष्ट व जिच्यामुळे जास्त संरक्षण मिळेल अशा योजनेकडे मी मुसलमानांचे लक्ष वेधू इच्छितो. मी असे प्रतिपादन करतो की, ती माझी योजना पाकिस्तानच्या योजनेपेक्षा अधिक उत्कृष्ट
आहे. माझ्या योजनेशी अनुकूल जे मुद्दे आहेत ते जर याठिकाणी निविदिले तर
अनाठायी होणार नाही ! ते येणेप्रमाणे,
(अ) ज्या जातीय बहुसंख्येच्या भीतीमुळे पाकिस्तानची मुहूर्तमेढ रोवण्यात
आली आहे ती भीतीच या योजनेमुळे नष्टप्राय झाली आहे.
(ब) आजपर्यंत मुस्लिम समाजाने ज्या जादा जागांचा उपभोग घेतला आहे त्या
माझ्या योजनेमध्ये जशाच्या तशाच कायम आहेत.
(क) पाकिस्तान विरहित प्रांतांमध्ये मुसलमानांच्या प्रतिनिधीत्वात वाढ
केल्यामुळे त्यांची परिस्थिती इतकी मजबूत झाली आहे की, जी पाकिस्तानला
मूर्त स्वरूप प्राप्त झाले असते तर त्यांना कधीही अनुभवावयास मिळाली नसती,
एवढेच काय पण आज त्यांची जी परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती
निर्माण झाली असती.
हिंदू लोक इकडे लक्ष देतील काय ?
वाटेल ते झाले तरी बहुमतावरच राज्यकारभार चालवा हेच एकमेव पवित्र कार्य
आहे, या प्रकारचे अडेलतट्टू धोरण हिंदुनी स्वीकारल्यामुळे आज जातीय प्रश्नाचा
अगदी बाऊ निर्माण झाला आहे. राज्यकारभार हाकण्याची दुसरी एक
पद्धत आहे. जी कदाचित हिंदुंना माहित नसेल परंतु जिचा व्यक्ती व राष्ट्र
यामध्ये जेव्हा महत्त्वाचे भांडण निर्माण होते तेव्हा प्रामुख्याने उपयोग होतो,