आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको ५२९
हिंदी पेचप्रसंग सोडविणे ही साधी गोष्ट नव्हे. जिला डिव्हाइनली आर्डेनड्
कन्पयुजन (Divinely ordained confusion) म्हणता येईल अशा १८६७ साली
अस्तित्वात असणाऱ्या कॉन्फेडरेशन पूर्वी जर्मनीची जी परिस्थिती होती तिचे एका
इतिहासकाराने वर्णन केलेले माझ्या वाचनात आले आहे आणि ते मला चांगले
आठवते. ती गोष्ट जर्मनीच्या बाबतीत सत्य होती किंवा नव्हती याबद्दल
आपणाला काही एक कर्तव्य नाही, परंतु हिंदुस्थानाच्या वर्तमान परिस्थितीशी ते
वर्णन अगदी तंतोतंत लागू पडते. कित्येक प्रयत्नानंतर जर्मनीला या बिकट
परिस्थितीचा नाश करता आला. परवा या युद्धापूर्वी जर्मन जनता एकजीव
झाली, तिच्या अंतरंगात व बहिरंगात एकरूपता निर्माण झाली इतकेच नव्हे तर
नेहमीच्या वागण्यात देखील तिच्यात ऐक्य दिसू लागले. आदेश देण्यासाठी
हिंदुस्थान या गुंतागुंतीच्या मार्गातून अद्याप बाहेर पडलेला नाही. याचा अर्थ
असा नव्हे की, त्याला तसे करण्यास संधी मिळाली नाही, परंतु वस्तुस्थिती अशी
आहे की, बऱ्याच वेळा हिंदुस्थानला या बाबतीत संधी मिळाली आहे. १९२७
साली लॉर्ड बकनहेडने हिंदी लोकांना राजकीय घटना तयार करण्याचे जे आव्हान
दिले ती पहिली संधी होय. त्याचा हिंदी लोकांनी स्वीकार करुन घटना तयार
करण्यासाठी एक मंडळ नेमले. या मंडळाने ' नेहरू घटना ' नावाची एक घटना
तयार केली व ती जनतेपुढे मांडली परंतु लोकांनी तिला वाटाण्याच्या
अक्षता लावून दुःख प्रदर्शन न करिता मूठमाती दिली. १९३० साली हिंदी लोक
गोलमेज परिषदेसाठी जमले. ही दुसरी संधी होय. त्यावेळी सुद्धा हिंदी लोक
त्यांचा डावं खेळू शकले नाहीत व घटनाही तयार करू शकले नाहीत. कालपरवा
सप्रू कमिटीने तिसरा प्रयत्न केला परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही.
आणखी एखादा प्रयत्न करण्याच्या बाबतीत आता आशावाद किंवा औत्सुक्य
उरलेले नाही. वाटेल तो प्रयत्न केला तरी तो विफल होणार आहे. मग प्रयत्न कराच कशाला, या विचाराने प्रत्येक व्यक्तीचे मन अगदी भारून गेले
आहे. या प्रसंगी मला हे सांगावयाचे आहे की, कोणत्याही हिंदवासीयानी कचरून जाता कामा नये, अगर मेलेल्या ढोराची जशी घाण येते त्याप्रमाणे पेच प्रसंगाची घाण घेत राहाण्याइतके कठोर होऊ नये अथवा या देशातील राजकारणात कुत्र्याच्या भांडणाप्रमाणे जे भांडण चालले आहे ते बघ्यासारखे पाहात राहाण्यापेक्षा दुसरे काही एक करू शकणार नाही अशा प्रकारचे अवाक्षर देखिल काढता कामा नये. गतकालातील अपयशामुळे धैर्य खचून जाण्याचे काही कारण नाही आणि माझे धैर्य तर कधीही खचू शकणार [नाही. ] कारण मला असे वाटते की, जातीय प्रश्न सोडविण्याचे आजपर्यंत [जे ] [प्रयत्न ] [झाले ] [ते ] [सर्व ] अयशस्वी ठरले. याचे कारण मुख्यत: हिंदी लोकांच्या अंगी असलेले [अनुवंशीक ] दोष हे नसून, हा प्रश्न सोडविण्यासाठी [ज्या ] [मार्गाचा ] [अवलंब ] [केला ] [जातो ]