आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५३०
योजना निर्विकार मनाने विचारात तोच मुळात चुकीचा आहे. मी सुचविलेली ही
योजनेमध्ये हा प्रश्न सोडविण्याचा घेतली तर ती स्वीकारणीय वाटेल. माझ्या
नवा दृष्टिकोन आहे. हिंदी जनतेने तो अवश्य विचारात घ्यावा.
शेवटी, माझे टीकाकार काही बाबतीत या योजनेवर काही सूचना सुचवू
शकतील, परंतु ती सर्वस्वी अमान्य करणे त्यांना जड जाइल. इतकेही करून
त्यांनी ती नाकारलीच तर ही योजना ज्या तत्त्वांवर आधारली आहे, त्याबद्दल
त्यांना वाद उपस्थित करावा लागेल." १
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तुत भाषणावर ' टाईम्स ऑफ इंडिया ' पत्राने .
अग्रलेख लिहून दखल. घेतली. तसेच श्री. ठक्करबाप्पा यांनी याच दैनिकाला
पत्र लिहून प्रतिक्रिया व्यक्त केली. अग्रलेखाला आणि ठक्करबाप्पांच्या
पत्राला डॉ. आंबेडकरांनी “टाईम्स ऑफ इंडिया'त उत्तर दिले. त्याचा वृत्तांत
दि. २६ मे १९४५ 'च्या 'जनता' पत्रात प्रकाशित झाला होता. . तो इथे देत
आहोत.--संपादक.
“ मुंबई येथील ' टाईम्स ऑफ इंडिया ' या इंग्रजी दैनिकाने डॉ. आंबेडकर योजनेवर अग्रलेखात जी टीका केली आहे त्या टिकेला आणि ' ऑल इंडिया
हरिजन सेवक संघाचे ' जनरल सेक्रेटरी श्री. ठक्करबाप्पा यांनी ता. १७ मे १९४५
च्या टाईम्समध्ये केलेल्या टीकेला अनुक्रमे ता. १७-५-१९४५ व १८-५-१९४५
च्या टाईम्समध्ये डॉ. बाबासाहेबांनी उत्तरे दिली आहेत. ती जनतेच्या वाचकाकरिता येथे देत आहोत
संपादक ' टाईम्स ऑफ इंडिया '
जातीय पेचप्रसंग सोडविण्यासंबंधी मी सुचविलेल्या योजनेवर ' टाईम्स ऑफ
इंडियाच्या ' १७-५-१९४५ च्या अग्रलेखात परिक्षण करण्यात आले आहे. या परिक्षणात संपादक महाशय लिहितात, “ सदर योजनेवर हिंदू आणि मुसलमान असेच मत देतील की अस्पृश्यांचे हित साधण्यासाठी त्यांना भरमसाठ अधिकार देणारी ही योजना आहे
डॉ. आंबेडकरांच्या या योजनेचे बारकाईने निरीक्षण केले तर असेच दिसून येईल की अस्पृश्यांना मध्यवर्ती आणि प्रांतिक विधीमंडळात देऊ करण्यात येणाऱ्या जागांमुळे, दोन श्रेष्ठ जमातींवर वर्चस्व गाजविता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. . याप्रकारे वाममार्गाचा चातुर्याने उपयोग करून अनादिकालापासून पददलित अशा लोकांना अभिनव जमातीचा दर्जा प्राप्त करून देण्याचा उपरोधिक प्रयत्न करण्यात आला आहे
` जनता : १९-५-१९४५, २६-५-४५, २-६-४५, ९-६-४५, १६-६-४५, २३-६-४५