२५-१-१९३७ खोटे दस्तऐवज करणारे गरीब शेतकरी, कामकरी लोकांचे कल्याण करतील काय ? - Page 57

खोटे दस्तऐवज करणारे . . . . . कल्याण करतील काय ? १९

तुमचे नुकसान करावयाचे आहे म्हणून तुम्ही त्यांच्या कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका. तुम्ही आपल्या विरुद्ध पक्षांचा विचार करा आणि स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार श्री. रोहम यांनाच आपली सर्व मते द्या अशी मी तुम्हास विनंती करतो. आता जाता जाता मला, अहमदनगर कॅम्पमधील स्काउट मंडळाचे अभिनंदन केल्यावाचून राहवत नाही. तुमच्या अंगी शूरत्व बनण्यास स्काऊट हे एक साधन आहे म्हणून प्रत्येक खेडेगावच्या लोकांनी सुद्धा आपल्या ११ वर्षाच्या पुढील मुलास स्काउटचा ड्रेस केला पाहिजे. आता धोतरे नकोत. या घोतरांनी आपली फार नासाडी केली आहे. आजची ही शेकडो स्काउट मंडळी पाहून मला फार आनंद वाटतो व मी पुन्हा या स्काउट मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे म्हणून त्यांनी आपले भाषण पुरे केले. त्या वेळेस टाळ्यांचा कडकडाट व त्यांच्या नावाचा जयजयकार व बँड, शिंगे, तुताऱ्या वगैरे वाद्यांनी तो भव्य मंडप दुमदुमून गेला. त्यांनी अहमदनगर कँप फर्स्ट लाईन स्काउट ट्रप, रायीचा मळा बलभीम स्काउट, प्रगती मातंग मंडळ, माळीवाडा स्काउट, दरेवाडी स्काउट, बाकोड़ी स्काउट, सदर कँप मातंग स्काउट वगैरे स्काउटला यश चितनपर लेखी शेरे दिले. नंतर श्री. प्रभाकर जनार्दन रोहम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नगर जिल्ह्याला भेट दिल्याबद्दल बाबासाहेबांचे आभार मानले व जमलेल्या सर्व लोकांनी व मतदारांनी माझ्या विषयी जी निष्ठा व प्रेम व्यक्‍त केले त्याबद्दल मी सर्व समाजाचा अत्यंत ऋणी असून, आपल्या नगर जिल्ह्याने इलेक्शनच्या बाबतीत जी धडाडी दाखविली ती अत्यंत वाखाणण्यासारखी असून अभिनंदनास पात्र आहे असे स्फूतिदायक भाषण केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते फर्स्ट लॉयन स्काउटचे (जुने) कॅप्टन ल. बा. बनसोडे, बलभीम स्काउटचे कॅप्टन श्रीपतराव गायकवाड, दरेवाडी स्काउटचे कॅप्टन कुंडलिक भिंगारदिवे, बाकोडी स्काउटचे कॅ. किसनराव, मातंग प्रगती मंडळ स्काउटचे कॅ. किसनराव पारधे यांना व व्यायाम मंडळाचे वस्ताद यशवंत श्रावण पाटोळे, राहुरीचे बँड मास्तर नामदेव साळवे यांना रौप्य पदक अर्पण करण्यात आले. शेवटी सर्व संस्थेतफं बाबासाहेबांना हार अर्पण करण्यात आले. नंतर बाबासाहेब यांच्या जयजयकारात ही जंगी सभा बरखास्त झाली.

७. ७ ७