१००
भूलथापास बळी न पडता
सावधगिरीने वागले पाहिजे
अखिल भारतीग अस्पृश्य समाजाचे एकमेव पुढारी व स्वतंत्र मजूर पक्षाचे रांस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. ए., पीएच. डी., बार-अँट-लॉ हे दिनांक २५ जानेवारी १९३७ रोजी सोलापूर व नगर जिल्ह्यातील दौरा संपवून रात्री साडे तीन वाजता जळगाव स्टेशनवर आले. त्यांचे बरोबर पूर्व खानदेशातील स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार श्री. दौलतराव गुलाजी जाधव, बी. ए. हे होते. जामनेरला पोचल्यावर जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीचे सभेत रुपांतर झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेला संबोधित करताना
म्हणाले,
आज मी दौऱ्यावर का निघालो, आपणास कळले आहे. येत्या सुधारणा कायद्यानुसार आपणास मुंबई कायदे कौन्सिलमध्ये १५ उमेदवार निवडून देण्याचा अधिकार मिळाला आहे. राज्यघटनेनुसार स्थापन होणाऱ्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये एकूण १७५ सभासद असतात. त्यांच्या मानाने आपले थोडे आणि तेही जर एकजुटीने राहिले नाहीत तर आपले काहीच हित साधणार नाही. सर्व लोक एकजुटीने राहाण्यास ते कोणत्यातरी पक्षास निगडित झाले पाहिजेत. तुमच्या जिल्ह्यातर्फे मी माझ्या पक्षातर्फे श्री. जाधव ह्यांची निवड केली आहे. त्यांना विरोध करणारे श्री. मेढे, बिप्हाडे किती लायकीचे आहेत ते आपणास माहीत आहे. जाधव जर पुढे तुमच्या इच्छेप्रमाणे वागणार नाही तर त्याला जबाबदार मी आहे पण श्री. मेढेच्या बाबतीत तुम्ही कोणास जबाबदार धरणार ? दुसरी गोष्ट म्हणजे कायदे कौन्सिलमध्ये सर्व कामे इंग्रजीतून चालण असल्यामुळे तुमची गाऱ्हाणी मांडण्यास चांगला इंग्रजी जाणणारा मनुष्य पाहिजे. त्या गोष्टीस लायक इसम फक्त श्री. जाधव आहे. श्री. जाधव काही माझा नातलग नाही व इतर उमेदवार माझे शत्रू नाहीत पण ज्या त्या कामास जो तो मनुष्य नेमणे माझे कर्तव्य आहे. तुम्हास हा हकक मिळू नये म्हणून महात्मा गांधी सारख्या लोकांनी प्राणांतिक उपवास आरंभिला होता परंतु त्यास न जुमानता हा हक्क आम्ही मिळविला आहे. त्याचा उपयोग करणे आता तुमच्या स्वाधीन आहे. तुम्हास बळी पाडण्याकरिता काही लोक तुमच्या करिता बोडिंगे काढतात, चहादारी करतात पण ते सर्व अगदी थोडावेळ टिकणारे आहे. तेवढ्याने आपला
जनता : ६ फेब्रुवारी १९३७.