आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको ' ५३१
2-१ आमच्या मते डॉ. आंबेडकर यांची योजना साधारणपणे विधायक
असली तरी हिंदू-मुसलमानांच्या कडून करण्यात येत असलेल्या ज्या अतिशयोक्तिचे
हे अस्पृश्यांचे पुढारी नेहमी वाभाडे काढीत असतात, तीच अतिशयोक्ती त्यांच्या
योजनेत आत्यंतिक स्वरूपात दिसून येते
मला हे सांगताना वाईट वाटते की योजनेचा हा विपर्यास करण्यात आला
आहे. याचे कारण सापेक्ष बहुमताच्या तत्त्वाचा मतितार्थच टाईम्सकारांना कळला
नाही.
माझ्या योजनेसंबंधी पसरविण्यात आलेला गैरसमज दूर करण्यासाठी खालील
लिखाणाला जागा द्याल अशी आशा आहे.
संपादक महाशय एक गोष्ट विसरले आहेत ती ही की एकदा का सापेक्ष
बहुमताचे तत्त्व मान्य केले-संपादकाँना ते मान्य आहे असे दिसते--तर संपूर्ण
बहुमत आणि सापेक्ष बहुमत यांच्यातील फरकाइतक्याच जागा बाकी
राहतात. दगडधोंडे समजून त्या बाकी राहिलेल्या: जागा, कुठेतरी झुगारून
काही देता येणार नाहीत. त्यांची वासलात लावायची म्हटले म्हणजे त्याला. एकच उपाय. आहे. तो म्हणजे अल्पसंख्यांकांकडे त्यांची योग्य वाटणी : करायची. आता प्रश्न इतकाच राहील की त्यांची वाटणी कशी करायची ? .
या बाकी राहिलेल्या सर्वच्या सर्व जागा मुसलमानांच्या हिताच्या कामी लावावयाच्या किंवा कोणत्याही संयुक्तिक तत्त्वाच्या आधारे अल्पसंख्यांकात त्यांची वाटणी करायची ? जर संपादकांना पहिली गोष्टः मान्य असेल तर त्याचा असा स्पष्ट अर्थ होईल की मुसलमानांच्या पन्नास टक्के मागणीला त्यांचा (संपादकाचा) पाठिंबा आहे. पण पहिल्या ऐवजी दुसरी गोष्ट जर त्यांनी. मान्य केली आणि त्यामुळे परिणामी अस्पृश्यांना मिळणाऱ्या प्रतिनिधीत्वापेक्षा जादा प्रतिनिधीत्व प्राप्त झाले तर, माझ्या योजनेत अस्पृश्यांना इंद्रपद प्राप्त करून देण्याची मुद्दाम तरतूद करण्यात आली आहे असे कसे म्हणता येईल ? आणि संयुक्तिक योजनेनुसार जागांची वाटणी केल्यामुळे अस्पृश्यांना त्यांचा न्याय्य हिस्सा मिळत असला तर निःपक्षपाती मनुष्य त्याला कशी हरकत घेऊ शकतो; हे मला तरी काही समजत नाही. मी माझ्या योजनेत जागांची जी वाटणी केली आहे ती केवळ सापेक्ष बहुमताचे तत्त्व आणि संयुक्तिक वाटणीच्या सामान्य नियमावर आधारलेली आहे.
आपला, |
बी. आर. आंबेडकर
` मुंबई १५-५-१९४५. , |
` प्रस्तूत अग्रलेख प्रकाशित झालेल्या टाईम्स ऑफ [इंडियाच्या ] [अंकातील ] [तारीख ] [आणि ] | त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या [प्रतिक्रियेच्या ] [तारखेचा ] [क्रम ] [संयुक्तिक ] [वाटत ] नाही. त्यामुळे जनतेच्या अंकात तारीख [देण्यात ] [चूक ] [झाली ] [असावी.--संपादक. ]