६-५-१९४५ आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको - Page 572

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५२२

ठक्कर योजनेवर श्री. ए. बी. उर्फ डॉ. आंबेडकर

ठक्करबाप्पा यांची टीका

पेच प्रसंगावर जातीय डॉ. आंबेडकर यांनी हिंदुस्थानच्या राजकीय

असा आहे की, तोडगा सुचविताना काही तत्त्वे पुढे मांडली आहेत; त्यांचा आग्रह कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता ती तत्त्वे सर्व जातींना लागू करण्यात यावी

परंतु आणि ते असा दावा करतात की ती सर्वांना अनुरूप अशीच आहेत. विधिमंडळात, अधिकारी वर्गात आणि नोकऱ्यात प्रतिनिधीत्व देण्यासंबंधी डॉ. आंबेडकर यांनी ज्या जातींची निवड केली आहे त्यात ब्रिटिश सरकारने १९३५ च्या कायद्यानुसार मान्यता दिलेल्या ' रानटी ज़ाती ' (भिल्ल वगैरे) ना अजिबात वगळले आहे. | | .

पददलित व मागासलेल्यांच्या या कैवाऱ्याने, अस्पृशांपेक्षाही वाईट स्थिती आलेल्या रानटी लोकांकडे पूर्णपणे कानाडोळा केलेला पाहून आश्चर्य वाटते. इतकेच नव्हे तर त्यांना जे काही देण्यात आले होते तेही त्यांनी (डॉ. आंबेडकरांनी) काढून घेतले. अहारे कैवारी ! |

सर्व जमातींना निर्भयपणे लागू करण्यासाठी पुढे मांडलेल्या तत्त्वांपैकी एकात डॉ. आंबेडकर म्हणतात की सर्व जातींची सामाजिक, आर्थिक आणि

शैक्षणिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या (परिस्थिती) च्या व्यस्त प्रमाणात त्या त्या

जातींना जादा अधिकार देण्यात यावेत आणि त्याच्याच आधारे अस्पृश्यांना

मुसलमानांपेक्षा विशेष सवलती देण्यात याव्यात असे ते सुचवितात.

डॉ. साहेबांचे हे तत्त्व जर या रानटी जातींना (अँबॉरिजिन्स) लागू केले तर

अस्पृश्यांच्या पेक्षा किती तरी पटीने अधिक सवलती त्यांना दिल्या जातील आणि

त्यामुळे संपूर्ण बहुमत होण्याचा संभव आहे. परंतु डोंगराळ प्रदेशात जीवन कंठणाऱ्या या एक कोटी सदुसष्ट लक्ष गरीबांना डॉ. आंबेडकर अजिबात विसरले

आहेत. |

यावरून एक तत्त्व मात्र ठळकपणे दिसून येते की अस्पृश्यांच्यासाठी पक्षपाताचा अतिरेक करून ' रानटी लोकांच्या ' न्याय्य हक्कांबद्दल मात्र डॉ. आंबेडकर

तिरस्करणीय नकार देत आहेत.

ए. बी. ठक्कर,