आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको ५३३
श्री. ए. बी. ठक्करबाप्पा यांच्या टीकेस डॉ. बाबासाहेबांनी
$ दिलेले उत्तर |
' संपादक, टाईम्स ऑफ इंडिया ' यास,
महाशय,
श्री. ठक्कर यांनी माझ्या योजनेवर केलेल्या टिकेस उत्तर म्हणून या लिखाणास
आपण जागा द्याल अशी आशा आहे.
जातीय मसुदा सादर करताना मी “ रानटी जमाती (अँबॉरीजिन्स) च्या हक्कांची पायमल्ली केली “ असे श्री. ठक्कर यांनी त्या जमातींच्या वतीने माझ्यावर सोठा उगारताना म्हटले आहे. या सोट्याची शोभा वाढविण्यासाठी ' पददलितांचा, रंजल्या-गांजलेल्यांचा कैवारी ' असे माझे वर्णन केले आहे. श्री. ठक्कर यांना मला असे सांगावेसे वाटते की, ' मी, पददलित-मानव जातीचा सार्वभौम नेता आहे ' असे मी कधीच म्हटलेले नाही. माझ्या शक्तिच्या मानाने अस्पृश्य समाजाचे कार्य माझ्यासाठी. पुरेसे आहे आणि तुमच्या त्याचप्रमाणे गांधीच्या मगरमिठीतून, मी अस्पृश्यांची सोडवणूक करू शकलो तर मला पराकाष्ठेचा आनंद होईल.
कोणतेही कार्य कमी लेखण्याची मांझी इच्छा नाही परंतु आयुष्याची वयोमर्यादा लक्षात घेता एक मनुष्य एकच कार्य करू शकतो. ही गोष्ट डोळ्यापुढे ठेऊन श्री. ठक्कर म्हणतात त्याप्रमाणे ज्यांना रानटी लोक देखील दूर लोटतात अशा अस्पृश्य समाजाच्या कार्यासाठी मी स्वतःला वाहून घेतले आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या भाषणातील काही भागावर विसंबून श्री. ठक्कर यांनी माझ्यावर टीका करावी याबद्दल त्यांची मला कीव कराविशी वाटते. माझे सबंध भाषण वाचून काढण्याची त्यांनी जर दक्षता घेतली असती तर त्यांना कळून चुकले असते की माझ्या योजनेत रानटी जातींना वगळलेले तर नाहीच पण उलट परिणामकारक आणि उत्तम प्रकारे त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले आहे. सदर योजनेतील बारीकसारीक मुद्दे मांडण्यासाठी ही जागा अपुरी आहे. माझ्यावर पक्षपातीपणाचा आणि क्षुद्र मनोवृत्तीचा आरोप करण्यापूर्वी रानटी जमातीच्या दृष्टीने माझ्या योजनेचा विचार करावा. |
कायदेमंडळातील जागांची विभागणी करताना त्यात रानटी जमातींचा मी समावेश केला नाही. याचे कारण त्यांच्याशी माझे वैर आहे हे नसून, त्यांच्याजवळ राजकीय मनःसामर्थ्य नाही, अशी माझी खात्री आहे. म्हंणून, श्री ठक्कर यांना असे विचारतो की रानटी जमातीस आपण कोणत्या परिस्थितीत आहोत याची जाणीव होण्यासाठी, राजकीय सत्तेच्या जोरावर हिंदुंच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी,